शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 19:41 IST

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. २४ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू झाले होते व मागण्या पूर्ण न झाल्यास १ ऑक्टोबरपासून पूर्ण काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले. २४ सप्टेंबरला कर्मचारी कामावर आले. मात्र, ते स्वाक्षरी करून आंदोलनाच्या ठिकाणी एकत्रित जमले. नागपूर विद्यापीठाच्या महाराज बागसमोरील परिसरासह कॅम्पससमोरदेखील हे आंदोलन करण्यात आले. सर्वच कर्मचारी व अधिकारी संघटना यात सहभागी झाल्या आहेत. कृती समितीच्या सदस्यांची उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चादेखील झाली व मंत्र्यांनी मागण्या पूर्ण होतील असे आश्वासनदेखील दिले. मात्र याअगोदरदेखील असेच आश्वासन मिळाले होते. त्यामुळे जोपर्यंत शासननिर्णय जारी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका समितीने घेतली. त्यानुसार आंदोलन अद्यापही सुरूच आहे. १ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन केले आहे. अशा स्थितीत आंदोलनामुळे महत्त्वाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठEmployeeकर्मचारीagitationआंदोलन