शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
5
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
6
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
7
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
8
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
9
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
10
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
12
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
13
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
14
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
15
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
16
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
17
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
18
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
19
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
20
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेबांच्या स्मृतिदिनाला नागपूर विद्यापीठाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:45 IST

वंचित आणि शोषित समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दिवंगत माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २९ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला यंदा विद्यापीठ प्रशासनाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे गत २० वर्षांपासून होणाऱ्या या वैभवशाली परंपरेत खंड पडणार असल्याने दादासाहेब काळमेघ यांच्या चाहत्यात सध्या नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देकशी जपणार वैभवशाली संस्कृती ? : शिक्षणमंत्र्यांना हर्षवर्धन देशमुख यांचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित आणि शोषित समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे दिवंगत माजी कुलगुरु दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २९ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला यंदा विद्यापीठ प्रशासनाने नकार दर्शविला आहे. त्यामुळे गत २० वर्षांपासून होणाऱ्या या वैभवशाली परंपरेत खंड पडणार असल्याने दादासाहेब काळमेघ यांच्या चाहत्यात सध्या नाराजीचा सूर आहे.विद्यापीठात स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र यंदापासून विद्यापीठ प्रशासनाने दीक्षांत सभागृह केवळ विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठीच उपलब्ध होईल, असे कारण देत स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानची विनंती अमान्य केली आहे. दादासाहेबांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी २९ जुलै रोजी विद्यापीठाने भाडेतत्त्वावर तीन तासांसाठी दीक्षांत सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ यांनी केली होती. मात्र प्रशासकीय कारण देत ती अमान्य करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयावरून श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठविले आहे. यात त्यांनी दादासाहेब काळमेघ यांचे कर्तृत्व केवळ नागपूर विद्यापीठापुरते मर्यादित नसून त्यांनी कर्तृत्वाच्या बळावर अवघ्या महाराष्ट्रात स्वत:चा ठसा उमटविला होता. फुले, शाहू, डॉ.आंबेडकर, डॉ.पंजाबराव देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांत खऱ्या अर्थाने रुजविणारे दादासाहेब विद्यापीठाचे कुणीच नव्हते का, अशी विचारणा केली आहे. दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रमासाठी दीक्षांत सभागृहाची परवानगी नाकारल्याने विद्यापीठाची जनमानसात प्रतिमा उंचावले का, असा प्रश्नही देशमुख यांनी तावडे यांना केला आहे. इकडे प्रतिष्ठानच्य वतीने कार्यक्रमासाठी ९ जुलै या कार्यक्रमासाठी अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाने १३ जुलै रोजी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत दीक्षांत सभागृह केवळ विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दादासाहेब अखेरच्या श्वासापर्यंत गरिबांसाठी झटले. त्यांनी वंचितांना जगण्याचा मार्ग दाखविला. विद्यापीठाने कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे पत्र मिळाले. आता दादासाहेबांचा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहातून फोटो कधी हटवितात याची वाट बघतो आहे. या कार्यक्रमाला विद्यापीठाने परवानगी नाकारली असली तरी दादासाहेबांच्या हजारो चाहत्यांच्या आग्रहास्तव नागपुरात कार्यक्रम होईलच. यात कुणीही शंका ठेवण्याचे कारण नाही.हेमंत काळमेघसचिव, स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान

 

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर