शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

नागपूर विद्यापीठाचा दावा, पूर्ण परीक्षा 'फ्लॉप' नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 21:20 IST

Nagpur University, Online Exam राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे परीक्षा देता आली नाही. परंतु कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले त्यांची ‘ऑनलाईन’च फेरपरीक्षा घ्यायची की ‘ऑफलाईन’ परीक्षेसाठी त्यांना बोलवायचे यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठातर्फेसांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही : फेरपरीक्षा किंवा ‘ऑफलाईन’ परीक्षा यावर निर्णय होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे परीक्षा देता आली नाही. परंतु कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले त्यांची ‘ऑनलाईन’च फेरपरीक्षा घ्यायची की ‘ऑफलाईन’ परीक्षेसाठी त्यांना बोलवायचे यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठातर्फेसांगण्यात आले आहे. इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाची परीक्षा ही बऱ्यापैकी सुरळीत पार पडली आहे. त्यामुळे ‘सोशल मीडिया’वर पूर्ण परीक्षाच ‘फ्लॉप’ झाल्याच्या अफवा चुकीच्या असल्याचा दावा परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफु ल्ल साबळे यांनी केला.मुंबई विद्यापीठासह राज्यातील चार विद्यापीठांतील ऑनलाईन परीक्षा पहिल्या दिवशी सर्व्हरच्या समस्यांचा सामना करावा लागला. गोंडवाना विद्यापीठाला तर पेपरच रद्द करावा लागला. दुपारी दीड वाजतापासूनच्या टप्प्यात नागपूर विद्यापीठात जास्त समस्या जाणवल्या. यात वेळेवर ‘ओटीपी’ न मिळणे हा सर्वात मोठा मुद्दा होता. त्यामुळे विद्यार्थी तणावात आले. मात्र सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होईल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.यामुळे झाला गोंधळअनेक विद्यार्थ्यांनी वेळेवर ’ओटीपी’ मिळाला नसल्याची तक्रार केली. तांत्रिकदृष्ट्या ‘युझरनेम’ व ‘पासवर्ड’ टाकल्यानंतर लगेच ‘ओटीपी’ येईल अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. ‘ओटीपी’ येण्यासाठी त्यांनी पाच मिनिटांची प्रतिक्षा केली नाही आणि परत ‘हिट्स’ केल्या. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाच-सहा ‘ओटीपी’ ‘जनरेट’ झाले. त्या कालावधीत सुमारे ८ हजार ‘एसएमएस’ तयार झाले. त्यांच्या ‘डिलिव्हरी’साठी काही वेळ गेला व त्यात विद्यार्थी ‘पॅनिक’ झाले, असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दे़ऊ नकापहिल्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर प्राधिकरण सदस्यांनी विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देऊ नका अशी मागणी केली आहे. विद्यापीठाने कमी वेळेत ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. एखादा प्रयोग करताना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठाने घ्यावी व तांत्रिक त्रुटी दूर कराव्या असे प्रतिपादन विधिसभा सदस्य अ‍ॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षाonlineऑनलाइन