शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या आदेशाला नागपूर विद्यापीठाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:22 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या लॉ कॉलेज चौक व दिघोरी येथील शाखांना कायदेविषयक शिक्षण नियम-२००८ अनुसार दरवर्षी मान्यता घ्यावी लागेल व दरवर्षी निरीक्षण शुल्क अदा करावे लागेल, असा आदेश बार कौन्सिल आॅफ इंडियाने जारी केला आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या लॉ कॉलेज चौक व दिघोरी येथील शाखांना कायदेविषयक शिक्षण नियम-२००८ अनुसार दरवर्षी मान्यता घ्यावी लागेल व दरवर्षी निरीक्षण शुल्क अदा करावे लागेल, असा आदेश बार कौन्सिल आॅफ इंडियाने जारी केला आहे. त्याविरुद्ध विद्यापीठ व विधी महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास या महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांना मान्यता प्रदान करू नये अशी सूचना बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाला केली जाईल, अशी तंबीही बार कौन्सिल आॅफ इंडियाने दिली आहे. बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या या कृतीवर नागपूर विद्यापीठ व विधी महाविद्यालयाने आक्षेप घेतलाआहे.२ मे १९९७ रोजी जारी आदेशाद्वारे विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाला कायमस्वरूपी मान्यता प्रदान केल्या गेली आहे. त्यावेळी कायदेविषयक शिक्षण नियम-२००८ अस्तित्वात नव्हते. तसेच, या नियमानेही विधी महाविद्यालयाची कायमस्वरूपी मान्यता सुरक्षित ठेवली आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.आदेशावर स्थगितीयाचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कौन्सिलच्या वादग्रस्त आदेशावर अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे विद्यापीठ व विद्यालयाला दिलासा मिळाला. तसेच, न्यायालयाने राज्य सरकार व कौन्सिलला नोटीस बजावून याचिकेवर ४ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे व अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील तर, कौन्सिलतर्फे अ‍ॅड. कैलाश नरवाडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर