शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

‘एनएसएस’ पुरस्कारांत नागपूर विद्यापीठ ‘बेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:18 AM

परीक्षा प्रणालीत सर्व विद्यापीठांना मागे सोडणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एनएसएस’मध्येदेखील (नॅशनल सोशल सर्व्हिस) सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.

ठळक मुद्देसर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा सन्मान : २०१४-१५, २०१५-१६ च्या पुरस्कारांचे मुंबईत वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परीक्षा प्रणालीत सर्व विद्यापीठांना मागे सोडणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एनएसएस’मध्येदेखील (नॅशनल सोशल सर्व्हिस) सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला २०१५-१६ सालचा राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत हा समारंभ झाला व विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी याचा स्वीकार केला.राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कामगिरीसाठी राज्य शासनाकडून विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नि:स्वार्थ भावनेने काम केलेल्यांचा हे पुरस्कार देऊन राज्य शासनातर्फे गौरव करण्यात आला. मुंबईत २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षांसाठीच्या पुरस्कारांचे वितरण झाले.डॉ.भाऊ दायदार यांना उत्कृष्ट समन्वयक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या गटात नागपूरच्या मातृसेवा संघ समाजकार्य संस्थेला तिसरा पुरस्कार मिळाला तर याच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.केशव वाळके यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी गटात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर भंडारा येथील जे.एम.पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी साकुरे हिला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक हा पुरस्कार देण्यात आला.२०१४-१५ या वर्षासाठी एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्वेता फुके हिला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे उल्हास मोगलेवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.शिंदे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने डॉ.प्रमोद येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ‘एनएसएस’च्या माध्यमातून होणाºया सामाजिक कार्यांवर प्रकाश टाकला.