शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

नागपूर विद्यापीठ : वसतिगृहात चक्क ‘पलंग’ घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:18 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळ्यानंतर आता चक्क ‘पलंग’ घोटाळा उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देमाजी ‘वॉर्डन’चा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळ्यानंतर आता चक्क ‘पलंग’ घोटाळा उघडकीस आला आहे. माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाके यांच्या कार्यकाळात पलंग, खुर्ची आणि टेबलच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाला आढळून आले असून याचीदेखील चौकशी सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षा ठेवेच्या १६ लाखांहून अधिक निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अगोदरच शेडमाके यांची चौकशी सुरू आहे.प्रकाश शेडमाके हे जवळपास तीन वर्ष विद्यापीठाच्या वसतिगृहाचे ‘वॉर्डन’ होते. या कालावधीत त्यांनी वसतिगृहासाठी १८० पलंगांची ‘आॅर्डर’ दिली होती. यासंदर्भात निविदादेखील काढण्यात आली होती. प्रत्यक्षात वसतिगृहात ८० पलंगच आले. याचप्रमाणे १५० टेबलची ‘आॅर्डर’ देण्यात आली व त्यापैकी ५० ‘टेबल’ वसतिगृहात आले. तर खुर्च्यांच्या बाबतीतदेखील अशीच स्थिती होती. शेडमाके यांनी ‘मेस डिपॉझिट’च्या शुल्काबाबत केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. तीच समिती या घोटाळ््याचीदेखील चौकशी करेल, अशी माहिती डॉ.काणे यांनी दिली.हा होता शेडमाकेंनी केलेला पहिला गैरव्यवहारनागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांकडून ‘मेस डिपॉझिट’च्या नावाखाली प्रत्येकी दोन हजार रुपये घेण्यात येतात. हे शुल्क एका विशिष्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते व त्या खात्यातून पैसे काढण्याचे कुठलेही अधिकार ‘वॉर्डन’कडे नसतात. विद्यापीठाचे माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाके यांनी या बँक खात्यातून परस्पर खात्याच्या ‘सेल्फ चेक’च्या माध्यमातून ही रक्कम काढली. नवे ‘वॉर्डन’ डॉ.शामराव कोरेटी यांच्या निदर्शनास ही बाब आली व त्यांनी त्याबाबत लगेच प्रशासनाला माहिती दिली.चौकशी समितीसमोर शेडमाके गैरहजरचौकशी समितीसमोर प्रकाश शेडमाके केवळ एकदाच आल्याचे कुलगुरूंनी सांगितले. सुरुवातीला त्यांनी माझे चेकबुक हरविले यासारखी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दुसऱ्या वेळी आपली बाजू लेखी मांडण्याची त्यांना संधी देण्यात आली. मात्र त्याला ते आलेच नाही. आता आणखी एकदा त्यांना बोलाविण्यात येईल. जर ते आले नाही तर त्यांना काही सांगायचे नाही, असा निष्कर्ष काढून समिती अहवाल सादर करेल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठfraudधोकेबाजी