शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : उपस्थितीची अट मागे, अंमलबजावणी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:03 IST

विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांतील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती. मात्र प्राध्यापकांचा विरोध व इतक्या मनुष्यबळाची प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसल्याने आवश्यकतेनुसार बोलवावे, असे निर्देश राज्य शासनाने जारी केले.

ठळक मुद्दे प्रशासनाने पत्र काढले, काही महाविद्यालयांकडून वाटाण्याच्या अक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांतील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती. मात्र प्राध्यापकांचा विरोध व इतक्या मनुष्यबळाची प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसल्याने आवश्यकतेनुसार बोलवावे, असे निर्देश राज्य शासनाने जारी केले. विद्यापीठानेदेखील यासंदर्भात पत्र जारी केले. मात्र काही महाविद्यालयांकडून याला वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात येत असल्याची तेथील प्राध्यापकांनीच माहिती दिली आहे.राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने १८ सप्टेंबर रोजी नवा शासननिर्णय जाहीर केला. विद्यापीठे आणि कॉलेजेस येथे शंभर टक्के उपस्थिती राखली जावी असे त्यात म्हटले होते. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. अशा स्थितीत मूल्यांकनाचेदेखील काम जास्त राहणार नाही. अशा स्थितीत सर्व वर्षांना शिकविणाऱ्या शिक्षकांना बोलविण्याची काहीच गरज नाही, असे शिक्षकांचे म्हणणे होते. त्यानुसार शिक्षक संघटनांनी शासनाला निवेदने पाठविली. कोरोनाची स्थिती लक्षात घेता आवश्यकतेनुसार प्राध्यापकांना महाविद्यालयांत बोलवावे असा निर्णय शासनाने जारी केला.नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी या आदेशानुसार महाविद्यालयांसाठी पत्र जारी केले. मात्र काही महाविद्यालयांनी मात्र विद्यापीठाचे निर्देश गंभीरतेने घेतलेले नाहीत. काही महाविद्यालयांनी आवश्यकता नसतानादेखील बहुतांश शिक्षकांना प्रत्यक्ष येण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठProfessorप्राध्यापकonlineऑनलाइनexamपरीक्षा