शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : इमारतीच्या कंत्राटदाराला प्रति दिवसाला १५ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाला पावणेचार वर्षे उलटूनदेखील बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराला एप्रिल महिन्याचा अवधी देण्यात आला होता. मात्र त्या कालावधीत काम न झाल्यामुळे दर दिवसाला दंड लावण्यात येत आहे. आता दंडाची रक्कम प्रति दिवस १५ हजार रुपये इतकी झाली आहे. तर विद्यापीठाने इमारतीचे काम २० जुलैपर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे ‘टार्गेट’च दिले आहे.

ठळक मुद्देनवीन प्रशासकीय इमारतीचे ‘टार्गेट’ आता २० जुलै

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाला पावणेचार वर्षे उलटूनदेखील बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराला एप्रिल महिन्याचा अवधी देण्यात आला होता. मात्र त्या कालावधीत काम न झाल्यामुळे दर दिवसाला दंड लावण्यात येत आहे. आता दंडाची रक्कम प्रति दिवस १५ हजार रुपये इतकी झाली आहे. तर विद्यापीठाने इमारतीचे काम २० जुलैपर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे ‘टार्गेट’च दिले आहे.‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी)अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी याचे भूमिपूजन पार पडले. मात्र पावणेचार वर्ष उलटून गेल्यावरदेखील काम पूर्ण झाले नाही. नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रशासनाने कंत्राटदाराला १३ डिसेंबर २०१८ अगोदर हे काम पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ दिले होते. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराकडून दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते. उन्हाळ्यात झालेली पाण्याची कमतरता, उपलब्ध न झालेली रेती आणि नोटाबंदी यामुळे बांधकामास विलंब झाल्याने कामाची ‘डेडलाईन’ वाढविण्यात यावी, अशी विनंती कंत्राटदारातर्फे करण्यात आली होती. हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे व्यवस्थापन परिषदेने देखील मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती व १३ एप्रिल २०१९ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही ‘डेडलाईन’देखील टळून गेली. यामुळे विद्यापीठाने १४ एप्रिलपासून दंड लावण्यास सुरुवात केली आहे.असा लागतो आहे दंड१४ एप्रिलपासून सुरुवातीचे १० दिवस विद्यापीठाने कंत्राटदाराला प्रतिदिवस पाच हजार याप्रमाणे दंड लावला. त्यानंतरचे दहा दिवस सात हजार पाचशे रुपयांचा दंड लावला. हा अवधी संपल्यावर प्रति दिवस १० हजार रुपये व आता प्रति दिवस १५ हजार रुपये इतका दंड लावण्यात येत आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.कंत्राटदाराला सूट मिळणारदरम्यान, रेतीची समस्या व विविध तांत्रिक कारणांमुळे उशीर झाल्याचे कंत्राटदाराने कारण सांगितले आहे. हा दंड लावण्यात येऊ नये अशी विनंतीदेखील केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय होईल. मात्र एखाद्या विद्यार्थ्याने मुदतीनंतर अर्ज भरला तर त्याच्याकडून विलंबशुल्क घेण्यात येते. या हिशेबाने कंत्राटदाराकडूनदेखील विलंबासाठी दंड वसूल केला पाहिजे, असा विद्यापीठ वर्तुळात सूर आहे.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ