शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींगचा खड्डा २० सप्टेंबरपर्यंत बुजवणार, एनएमआरडीएचे विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन

By आनंद डेकाटे | Updated: July 25, 2024 21:48 IST

Nagpur: दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा हा २० सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी गुरूवारी विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले.

- आनंद डेकाटे

नागपूर - दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा हा २० सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी गुरूवारी विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले.

दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींगच्या विरोधात १ जुलै रोजी आंबेडकरी अनुयायांनी मोठे आंदोलन केले. त्या आंदोलनाची दखल घेत शासनानेही भूमिगत पार्किंग रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून दीक्षाभूमीवर सुरू असलेले काम बंद पडले आहे. परंतु भूमिगत पार्किंगसाठी करण्यात आलेले खोदकाम तसेच पडून आहे. २५ दिवस लोटले तरी खड्डा बुजवण्यात आलेला नाही. त्यामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे. हे साचलेले पाणी मुख्य स्मारकासाठी धोकादायक ठरू शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

१२ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्यावेळी दीक्षाभूमीवर लाखो लोक येतील. तेव्हा त्या दिवसाच्या १५ दिवसांपूर्वीपर्यंत येथील खड्डा बुजवून ती जागा समतल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, मुक्तिवाहिनी, रिपब्लिकन मुव्हमेंट आदींसह ४० विविध संघटनांचे प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने गुरूवारी एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीणा यांची भेट घेऊन याविषयावर सविस्तर चर्चा केली तसेच त्यांना निवेदन सादर केले. काही तांत्रिक बाबीमुळे खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली नसली तरी २० सप्टेंबरपर्यंत खड्डा बुजवण्यात येईल, असे यावेळी एनएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले.  खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करा - भंते ससाईदीक्षाभूमी परिसरात पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. खड्ड्यातील पाणी उपसून जागा समतल करावी, अशा आशयाचे पत्र परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. यासोबतच एनआयटी, मनपा आणि एनएमआरडीला लेखी निवेदन पाठविले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर