शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भूमिगत केबल चोर अण्णा टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:33 IST

रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरणारी आंध्र प्रदेशातील चोरट्यांची अण्णा टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून पोलिसांनी ४१० किलोग्राम केबल आणि मोबाईलसह १ लाख, ७० हजारांचे साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देआंध्र प्रदेशातील आरोपी : पावणेदोन लाखांची केबल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरणारी आंध्र प्रदेशातील चोरट्यांची अण्णा टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून पोलिसांनी ४१० किलोग्राम केबल आणि मोबाईलसह १ लाख, ७० हजारांचे साहित्य जप्त केले.बुधवारी रात्री गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी बाजार परिसरात गस्तीवर असताना जी. दुर्गाप्रसाद विरास्वामी (वय ३८), जी. नागराजू नागेश्वरराव (वय ३६), जी. सुब्बाराव रामालू (वय ३४), व्ही डॅनियल चिन्नापाई (वय ३६), टी. रामूचेरास्वामी (वय २५), व्ही. गोपीशशी नारायण (वय २०) आणि जी. रामबाबू चिरय्या (वय ३०) हे सर्व संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू, कटर, लोखंडी सब्बल, दांडा आढळला. गुन्हे शाखेत नेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी रात्रीच्या वेळी भूमिगत केबल चोरी करून ती विकत असल्याची पोलिसांकडे कबुली दिली. त्यांनी बाजारात लपवून ठेवलेली ४१० किलो केबल (किंमत १ लाख, ६० हजार) पोलिसांच्या हवाली केली. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.लॉजमध्ये मुक्कामउपरोक्त टोळीतील चोरटे आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील अंमलापूरचे रहिवासी आहेत. ते यापूर्वी नागपुरात भूमिगत केबल लाईन टाकण्याच्या कामासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी मेट्रो आणि बीएसएनएलच्या भूमिगत केबल टाकण्याचे काम शहरात करण्यात आले. त्याची माहिती असल्यामुळे ही टोळी नागपुरात आली. मेट्रोत कामाला आहोत, असे सांगून हे चोरटे रेल्वेस्थानकाजवळच्या एका लॉजमध्ये राहत होते. त्यांनी आतापर्यंत कुठली कुठली केबल खोदून काढली आणि कुठे विकली, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.ती केबल सीताबर्डीतीलअण्णा टोळीने मंगळवारी रात्री बीएसएनएल कार्यालयाजवळून चोरली होती. रात्री १२ वाजतापासून हे चोरटे पहाटे ५ वाजेपर्यंत सब्बल, फावडे आणि कटरच्या साह्याने बीएसएनएलची भूमिगत केबल खोदून काढली. ही केबल त्यांनी लपवून ठेवली होती. याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर चोरट्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.

 

टॅग्स :theftचोरीArrestअटक