शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विद्यार्थ्यांसह दोघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:42 IST

दहावीची परीक्षा नुकतीच पास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी आणि लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी या घटना घडल्या.

ठळक मुद्देसर्पमित्रानेही केला आत्मघात : कारण अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीची परीक्षा नुकतीच पास करणाऱ्या एका विद्यार्थ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी आणि लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी या घटना घडल्या. एमआयडीसीतील शिवसदन सीताराम कडव यांच्याकडे त्यांचा भाचा कार्तिक विजय तुमसरे (वय १६) हा शिकण्यासाठी राहत होता. कडव यांचे घर बहुजन नगर इसासनी येथे असून दुसऱ्या भागात त्यांचे दुकान आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे कडव त्यांच्या दुकानात गेले. सायंकाळी ५.१० च्या सुमारास त्यांना घरून फोन आला. कार्तिक तुमसरेने गळफास लावून घेतल्याची माहिती मिळताच ते घरी पोहोचले. यावेळी त्यांचा भाचा कार्तिक हा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तो कसलीही हालचाल करत नसल्याचे पाहून कडव यांनी पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस तेथे पोहोचले. कार्तिकने नुकतीच दहावीची परीक्षा पास केली होती. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झाले नाही. एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली. चेतन नवलकिशोर केवलिया (वय २७) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. चेतन सर्पमित्र होता. तो ढोलताशा पथकातही जायचा. गुरुवारी घरी कार्यक्रम असल्यामुळे चेतन केवलिया याची बहीण सासरहून आली होती. दुपारपर्यंत पूजाअर्चा आणि जेवण झाल्यानंतर बहीण सासरी निघून गेली. तर आईवडील दुसरीकडे कामानिमित्त गेले. रात्री १० च्या सुमारास ते परत आले. तेव्हा आतून दार बंद होते. वडिलांनी दार ठोठावून, मोबाईलवर फोन करूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने दाराची कडी तोडून आत बघितले. तेव्हा चेतन केवलिया गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. नवलकिशोर केवलिया यांनी लकडगंज पोलिसांना माहिती कळविली. त्यावरून उपनिरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळ गाठले. चेतन केवलियाचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर