शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत चोवीस तासात दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:20 IST

गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकासमोर महिलेची तर यशोधरानगरात गांजा विकणाऱ्याची हत्या : सर्वत्र खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.रुबिना सलीम खान (रा. मोहननगर, सदर) ही महिला मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उड्डाण पुलाखाली ( प्रवेशद्वारासमोर) हातठेल्यावर फळ विकत होती. शुक्रवारू रात्री ८.४५ च्या सुमारास रुबिना मृतावस्थेत दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. रुबिनाच्या डोक्यावर आणि गळ्यावर घाव होता. चौकशीत तिची दोन ते तीन जणांनी हत्या केल्याचा संशय आजूबाजूच्यांनी व्यक्त केला. एका संशयिताचे नावही पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात वेगवेगळळ्या भागात रवाना झाली. दरम्यान, पोलिसांनी रुबिनाचा मृतदेह रुग्णालयात पाठविला. हत्येच्या या घटनेने रेल्वेस्थानक परिसरात दहशत निर्माण झाली होती.यशोधरानगरातील मृताचे नाव शेरू अली मोहम्मद अली (वय ४०) असून, तो एकता कॉलनी गौसीया मस्जीदजवळ सुकेशिनी राजेश बल्लारे (वय ३५) हिच्या घरी राहायचा. तो गांजा विकत होता. त्याच्याकडे ओरिसा, आंध्रप्रदेशमधील तस्कर नेहमी गांजाची खेप घेऊन येत होते. नेहमीप्रमाणे राजलक्ष्मी नामक महिला गुरुवारी गांजाची खेप घेऊन शेरू-सुकेशिनीच्या घरी आली. तिने घरात पिशवी ठेवली होती. त्याचवेळी तेथे जरीपटक्यातील लुंबिनीनगरात राहणारा आरोपी गोलू ऊर्फ विद्याधर कांबळे आला. तो निघून गेल्यानंतर राजलक्ष्मीच्या पिशवीतील तीन गांजाची पाकिटं गायब झाल्याचे शेरूच्या लक्षात आले. ते कांबळेनेच चोरले असावे, असा संशय आल्याने शेरूने कांबळेला बोलविले. कांबळे त्याच्या दोन साथीदारासह गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास शेरूच्या घरी पोहचला. यावेळी चोरलेला गांजा परत आणून दे, असे म्हणत शेरूने कांबळेसोबत वाद घातला. कांबळेने नकार देताच शेरूने त्याला दोन थापडा मारल्या. यामुळे कांबळेने त्याच्यावर लोखंडी पाईपने हल्ला चढवला. त्याला रक्तबंबाळ केल्यानंतर कांबळेसोबत असलेले त्याचे साथीदार कुणाल नरेंद्र वाघमारे (वय २०, रा. लुंबिनीनगर) आणि दाद्या ऊर्फ राहुल भीमराव इंगळे (वय २४) या दोघांनी शेरूला पकडले तर कांबळेने धारदार खंजराने शेरूवर सपासप घाव घालून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी सुकेशिनी बल्लारेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली.पळून जाण्याची होती तयारीशेरूची हत्या केल्यानंतर आरोपी कांबळे, वाघमारे आणि इंगळे यशोधरानगरातून पळून गेले. हे तिघेही गुन्हेगारी वृत्तीचे असून, यशोधरानगर तसेच जरीपटक्यात ते अवैध दारू, गांजाची विक्री करतात. त्यांनी पैशाची जुळवाजुळव केल्यानंतर पहाटे नागपुरातून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ठाणेदार पुंडलिक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यानी या तिघांच्याही मुसक्या बांधल्या. 

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर