शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: शरबत अन लाेणचे बनविण्यासाठी हे लिंबू वापरून बघा कृषी विद्यापीठाच्या संशाेधकांनी विकसित केल्या प्रजाती

By निशांत वानखेडे | Updated: October 28, 2023 19:53 IST

Nagpur: कडक उन्हाळ्यात लिंबूचे शरबत मिळणे व जेवणात लाेणचे असणे ही भारतीयांचे मन प्रसन्न करणारी गाेष्ट. मात्र लिंबू चांगले नसले की विशेषत: गृहिणींना मन:स्ताप हाेताे. मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेल्याच्या संशाेधकांनी लिंबूच्या काही प्रजाती विकसित केल्या आहेत.

- निशांत वानखेडेनागपूर - कडक उन्हाळ्यात लिंबूचे शरबत मिळणे व जेवणात लाेणचे असणे ही भारतीयांचे मन प्रसन्न करणारी गाेष्ट. मात्र लिंबू चांगले नसले की विशेषत: गृहिणींना मन:स्ताप हाेताे. मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेल्याच्या संशाेधकांनी लिंबूच्या काही प्रजाती विकसित केल्या आहेत, ज्यामुळे गृहिणींची तक्रार येणार नाही. यासाेबत दीडपट अधिक रस देणारी नागपुरी संत्र्याची प्रजातीही संशाेधकांनी शाेधली आहे.

पीडिकेव्हीच्या फळ विभागाचे सहयाेगी प्राध्यापक डाॅ. दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वात विकसित केलेल्या लिंबूच्या तीन व संत्र्याची एक प्रजाती शनिवारी एशियन सिट्रस काॅंग्रेसच्या प्रदर्शनात सादर केली. लिंबूच्या पीडीकेव्ही बहार, पीडीकेव्ही चक्रधर व पीडीकेव्ही तृप्ती तर संत्र्याची पीडीकेव्ही मॅंडेरिन यांचा समावेश आहे. यातील बहार लिंबू व संत्रा हे देशभरातील वेगवेगळ्या भागातून निवड केलेले तर इतर दाेन प्रजाती या म्युटंटद्वारे विकसित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १५ ते २० वर्षाच्या संशाेधनातून या प्रजाती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

विविध भागातून गाेळा केलेल्या प्रजातीतून निवडलेल्या सर्वाेत्तम प्रजातीपैकी असल्याचा दावा डाॅ. पैठणकर यांनी केला आहे. यापैकी संत्र्याची प्रजातीची महाराष्ट्रासह बाहेर राज्यात ५०० एकरापर्यंत लागवड हाेत असून बहार लिंबूची गुजरात, मध्य प्रदेश, काेलकाता व दिल्लीसह ५००० एकरात लागवड केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. चक्रधर लिंबू नवीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आहेत विशेषतापीडीकेव्ही बहार : गुच्छ्यात लागतात, उत्पादन दुप्पट हाेते, आकाराने माेठा, बिजमुक्त व रसदार आहे.पीडीकेव्ही चक्रधर : साल अतिशय पातळ असते, रसाचे प्रमाण ६० टक्के, चवीला गाेड, लिंबूला बिया नसतात, शरबतला कडवटपणा अतिशय कमी असताे आणि झाडाला काटे नसतात.

पीडीकेव्ही तृप्ती : लाेणच्यासाठी सर्वाेत्तम, साल जाड, गर अधिक असताे, रसाळ व जास्त काळ टिकताे.पीडीकेव्ही संत्रा : उत्कृष्ठ रंग, फळे झाडाच्या मध्ये असतात, नागपुरी संत्र्यापेक्षा दीडपट अधिक रस, चवीला गाेड, बसकट व बट्टीदार फळे येतात व आकारही माेठा असताे. आंबिया बहारात बिज नसतात व मृग बहारात बिज असतात.

संत्रा गळतीसाठी संजीवकेशेतकऱ्यांना संत्रा गळतीच्या समस्येचा सामना करावा लागताे. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने एन-अटका, ब्रासिलाेनाईड व फाॅलिक अॅसिडच्या मिश्रणातून संजीवक तयार केले असून ते संत्रा गळती थांबविण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :nagpurनागपूर