शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 12:03 IST

नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीस अटकेत घेतले आहे.

ठळक मुद्देएक आरोपी अटकेत

नागपूर : मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना माधव नागरी भागात एमआयडीसी पोलीस (Nagpur MIDC Police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या

माहितीनुसार, नागपुरातील एमआयडीसी पोलीस (Nagpur MIDC Police) ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी ही आपल्या मित्रासोबत रस्त्यावर उभी होती. दरम्यान तेथे चार तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीसोबतच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाला मारहाण करुन आरोपींनी पीडित मुलीला शेजारील शिवारात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने आपली सूत्रे हलवली आणि आपला तपास सुरू केला. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार असलेल्या तिन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नागपुरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नुकतंच नागपुरात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तर, आता ही घटना समोर आली असून नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी