शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वादळी पावसात झाडे कोसळली, भिंती पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 21:11 IST

गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले.गुरुवारी सकाळी कडक उन्ह पडले होते. या दरम्यान काही काळ शहराच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासोबत पाऊस आला. लक्ष्मीनगर झोन कार्यालयासमोरील मार्गावर झाड आडवे पडले. या सोबतच, शंकरनगरमधील हल्दीराम प्रतिष्ठानसमोरील मार्गावर आणि बजाजनगरातील बास्केटबॉल ग्राऊंडजवळील प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराजवळही एक झाड पडले. या घटनांमध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.

अभ्यंकर नगरात आमदार विकास ठाकरे यांच्या कार्यालयासमोरील उद्यानाची भिंत पडली. या भिंतीला लागूनच एक वाहन पार्क करण्यात आले होते. त्याचेही भिंत पडल्याने बरेच नुकसान झाले. स्वावलंबी नगरात नागोबा मंदिराजवळही एक झाड कोसळले. या घटनेतही कसलेच नुकसान झाले नाही. सुमारे तासभराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. अनेक ठिकाणचे आरयूबीदेखील पाण्याने तुडुंब भरले होते. यामुळे वाहनचालकांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागला. यातून जाणारे अनेक आॅटो आणि दुचाकी पाणी गेल्याने बंद पडले होते.
पुढचे तीन दिवस असेच वातावरण?अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत बदललेल्या वातावरणामुळे पुढील तीन दिवस उन्ह, ढगाळी वातावरण आणि पाऊस असे चित्र राहण्याची शक्यता आहे. ६ किंवा ७ जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या जोरदार पावसाची सूचना नाही; मात्र सकाळी ऊन तर सायंकाळी पाऊस असे काहीसे संमिश्र वातावरण या काळात अनुभवास येण्याची शक्यता आहे.एम. एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्रउप्पलवाडीमध्ये अडथळाकामठी रोडवर उप्पलवाडी येथे सुरू असलेल्या आरयूबीच्या दुसºया भागाचे काम अपूर्ण आहे. तयार करण्यात आलेला नवा आरयूबीदेखिल व्यवस्थित बांधलेला नाही. यामुळे या भागात नेहमीच पावसाचे पाणी साचते. नव्या आरयूबीमध्ये खड्डे पडले असून त्यात पाणी साचते. यातून जाणारे वाहन धोकादायकपणे हेलकावे खाते. या वर्दळीच्या मार्गालगत करण्यात आलेल्या खड्ड्यांमधील वाहून आलेली वाळू आणि माती येथे जमा होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्री वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नाही. पावसामुळे वाहने अडकून पडण्याचा अनुभव येथे नवा नाही. या भागात अद्यापही फोरलेनिंगचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे वाहतुकीला बराच अडथळा होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर