शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: धुक्यामुळे गाड्या लेट; ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’चा फायदा काय? रेल्वेचा दावा, किती खरा, किती खोटा

By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2024 22:43 IST

Indian Railway: ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’मुळे सिग्नल दृश्यमानता कमी असतानाही लोको पायलटला दाट धुक्यात स्पष्ट दिसेल. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असा दावा तीन आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता.

- नरेश डोंगरेनागपूर - ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस’मुळे सिग्नल दृश्यमानता कमी असतानाही लोको पायलटला दाट धुक्यात स्पष्ट दिसेल. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या गतीला ब्रेक बसणार नाही अन् प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, असा दावा तीन आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता. मात्र, धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या उत्तर भारतात शितलहर आल्याने उत्तर भारतातून देशाच्या विविध भागांत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर त्याचा प्रतिकुल परिणाम झाला आहे. भारताचा मध्यबिंदू असलेल्या नागपुरातून देशाच्या चारही बाजूला रेल्वेगाड्या येतात आणि जातात. अर्थात उत्तर भारताच्या शितलहरीचा आणि धुक्यामुळे प्रभावित झालेल्या रेल्वेगाड्याच्या संचलनाचा परिणाम नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवरही झाला आहे. गेल्या एका आठवड्यापासून धुक्यामुळे रेल्वेगाड्या उशिरा धावत आहेत. आज सोमवारी देखिल २६ गाड्या उशिरा धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून पुढे आली आहे आणि त्याचमुळे मध्य रेल्वेने कार्यान्वित केलेल्या ‘फॉग सेफ्टी डिव्हाइस सिस्टम’वरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

कारण मध्य रेल्वे प्रशासनाने २४ डिसेंबर २०२३ ला जारी केलेल्या माहितीनुसार मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या पाच विभागाला '५०० फॉग सेफ्टी डिव्हाईस' दिलेत. जीपीएस तंत्रज्ञानावर संचालित होणाऱ्या या उपकरण-सिस्टीममुळे रेल्वे इंजिनच्या चालकांना कमी दृश्यमानतेतही चांगले दिसेल. परिणामी धुक्यामुळे ट्रेनची गती जी साधारणत: ३० ते ६० किलोमिटर प्रतितास मंदावते, ती मंदावणार नाही आणि प्रवासी गाड्यांचा खोळंबा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, फॉग सेफ्टी डिव्हाईस कार्यान्वित असतानाही मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा किती खरा किती खोटा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

गाड्या लेट, दाव्यातील 'फॉग' बाहेर !रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला १२० फॉग सेफ्टी डिव्हाईस, नागपूर विभाग १२०, पुणे विभाग ८०, भुसावळ विभाग १०० उपकरणे आणि सोलापूर विभागाला ८० डिव्हाईस देण्यात आले तरीसुद्धा गाड्या उशिरा धावण्याचे प्रकार सुरूच असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांच्या दाव्यातील 'फॉग' बाहेर आला आहे. या संबंधाने विचारणा केली असता त्यांनी गाड्या उशिरा धावत असल्याचे मान्य केले. मात्र, सर्वच गाड्या धुक्यामुळे लेट नसल्याची पुस्तीही रेल्वे अधिकाऱ्यांनी जोडली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर