शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

नागपुरात व्यापाऱ्यांनी पाळला जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 21:08 IST

महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या घोषणेचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोनाच्या लढाईत आम्हीही सहभागी असल्याचा संदेश दिला.

ठळक मुद्देसर्व बाजारपेठा बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या घोषणेचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोनाच्या लढाईत आम्हीही सहभागी असल्याचा संदेश दिला. केवळ दूध, दही आणि भाज्यांची विक्रीची दुकाने सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती. शनिवारी दुकाने बंद असल्याने सर्व बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.सदर प्रतिनिधीने इतवारी, मस्कासाथ, महाल, सक्करदरा, सीताबर्डी, नागपूर सराफा बाजार (इतवारी), गांधीबाग, सीताबर्डी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, वर्धमाननगर आदी बाजारपेठांचा फेरफटका मारला असता येथील सर्वच दुकाने बंद होती. शनिवारी शासकीय कार्यालये बंद होती. त्यामुळे कर्मचारी घराबाहेर निघालेच नाहीत. शिवाय पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी गाडीचालक दिसलेच नाहीत.इतवारी किराणा बाजार असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, शनिवारी व रविवारी व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवावीत, अशी कुठलीही सूचना व्यापाºयांना केली नव्हती. पण कोरोना लढाईत व्यापाºयांनी एकजुटीचे प्रदर्शन केले. नागपुरातील सराफा व्यापाºयांची दुकाने बंद होती. याकरिता सर्व व्यापारी अभिनंदनास पात्र असल्याचे नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांनी सांगितले. किरकोळ किराणा व्यापाºयांनी एकजूट दाखवीत दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले, असे नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे म्हणाले. कपड्यांची दुकाने बंद ठेवून दुकानदारांनी कोरोनाच्या लढाईत शासनाला मदत केल्याचे गांधीबाग होलसेल क्वॉथ व यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी सांगितले.अधिकृत बाजार बंदशहरातील अधिकृत भाजीबाजारातसुद्धा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. तर विस्थापित केलेले बाजार सकाळी भरले, पण पोलिसांनी त्यांना सकाळी ७ नंतर हाकलून लावले. मुख्य रस्त्यावर नागपंचमीच्या पूजेच्या साहित्याची दुकाने सोडल्यास रस्ते सामसूम होते.दरम्यान, किरकोळ भाजीविक्रेत्यांनी कळमना व विस्थापित बाजारातून सकाळी भाजी खरेदी केली. वस्त्या-वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन भाजीही विक्री केली. दक्षिण नागपुरातील बुधवार बाजारात भाजी आणि फळ विक्रेत्यांच्या दुकाने बंद होती. उदयनगर, शताब्दीनगर रस्त्यावर भरणारा बाजार बंद होता. बाजाराच्या परिसरात पोलीस तैनात होते. सक्करदरा चौकात पोलिसांचा मोठा ताफा तैनात असल्याने भाजी व फळ विक्रेत्यांनी दुकाने उघडण्याचे धाडस केले नाही. रस्त्यावर एरवी दिसणारी भाजीची दुकाने लागली नव्हती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर