शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सेसविरोधात व्यापाऱ्यांचा १०० टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:24 IST

बाजार शुल्क (सेस) वसुलीच्या विरोधात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडने (कॅमिट) राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुकारलेल्या व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन करीत कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार बंद ठेवले.

ठळक मुद्देकळमना बाजार समितीत व्यवहार ठप्प : १८०० व्यापारी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाजार शुल्क (सेस) वसुलीच्या विरोधात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडने (कॅमिट) राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुकारलेल्या व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन करीत कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार बंद ठेवले. बंद आंदोलनाला व्यापाऱ्यांचा १०० टक्के प्रतिसाद मिळाला. विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने बंदला समर्थन दिले आहे, हे विशेष.आंदोलनात कांदा-बटाटा बाजार अडतिया वेलफेअर असोसिएशन, कळमना धान्यगंज अडतिया, युवा अडतिया सब्जी असोसिएशन, कळमना होलसेल मिरची मार्केट असोसिएशन, कळमना फ्रूट मार्केट असोसिएशन, होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशन आदी सहा बाजारातील व्यवहार बंद होते. या सहाही मार्केटमधील जवळपास १८०० व्यापारी संपावर गेले आहेत. सेसविरोधातील बंद आंदोलन संपूर्ण राज्यातील ३०७ बाजार समिती आणि ६१४ उपबाजारात सुरू आहे.केंद्र सरकारने राज्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून सेस आकारू नयेआणि शेतकºयांना समितीबाहेर कृषी माल विकता येईल, अशी अधिसूचना यावर्षी जूनमध्ये काढली आहे. देशात बहुतांश सर्वच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सेस आकारला जात नाही. पण महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सेस आकारणी अजूनही सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालाच्या खरेदीवर व्यापाऱ्यांकडून एक रुपयांच्या बदल्यात १.०५ रुपये बाजार शुल्क (सेस) आकारला जातो. त्यामुळे समित्यांमध्ये ५०टक्के कृषी मालाचे खरेदी-विक्री व्यवहार कमी झाले आहेत. सेसऐवजी सरकारने समितीच्या संचालनासाठी सेस आकारण्याऐवजी विकास शुल्क आकारावे, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार बाजार समितीतील सेस रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॅमिटचे कार्याध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी केली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डStrikeसंप