शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस शिपायासह तिघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:01 IST

आजारपणाला कंटाळलेल्या एका पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याचप्रमाणे कळमना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देइमामवाडा, कळमना, पाचपावलीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजारपणाला कंटाळलेल्या एका पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याचप्रमाणे कळमना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.महेश कॉलनी चंदननगर येथे राहणारे पोलीस शिपाई सुनील शेषराव भोयर (वय ५३) हे अनेक महिन्यापासून आजारी होते. त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात होती. आजारपणामुळे ते कर्तव्यावरही जाऊ शकत नव्हते. १४ ऑगस्टला अंघोळीला जाताना गरम पाणी अंगावर पडल्याने ते होरपळले. त्यामुळे त्यांच्या वेदना आणखीच वाढल्या. वारंवार उपचार करूनही आजारपणाला फायदा होत नसल्यामुळे ते वैतागले होते. या अवस्थेत त्यांनी सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, यावेळी पत्नी आणि मुलगा घरीच वरच्या माळ्यावर होते. मुलाला त्याचे मित्र भेटायला आले तेव्हा खालच्या माळ्यावर त्यांना भोयर गळफास लावून दिसले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. त्यांचा मुलगा सुमित सुनील भोयर याने पोलिसांना ही माहिती कळविली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.गळफास लावून आत्महत्या करण्याची दुसरी घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली. सागर हरिश्चंद्र डेहुनिया (वय २५) यांनी गळफास लावून घेतला. घरच्यांनी त्यांना डॉक्टरला दाखविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंदा हरिश्चंद्र डेहुनिया (वय ४५) यांनी दिलेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे पाचपावलीच्या वैशालीनगरात राहणारे संजय मारोतराव कैकाडे (वय ३५) यांनी गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजीव मारोतराव कैकाडे यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस