शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  तरुणीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:41 IST

मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. पाठलाग करून तिला अश्लील मेसेज पाठवून भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिचे लग्नही तोडले. आता त्याने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

ठळक मुद्देमैत्रीपूर्ण संबंधाला विचित्र वळण : कोराडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. पाठलाग करून तिला अश्लील मेसेज पाठवून भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिचे लग्नही तोडले. आता त्याने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करून स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.अतुल अशोक घोंगडे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंगणा जवळच्या इसासनीत राहतो. अतुलच्या नात्यातील एक उच्चशिक्षित तरुणी कोराडी परिसरात राहते. नात्यात लागत असल्यामुळे तिच्यासोबत त्याची ओळख आणि बोलणीही होती. पुढे त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. त्यामुळे एकमेकांशी बोलणे, मेसेज पाठविणे हा प्रकारही होताच. काही दिवसांपूर्वी अतुलने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. घरच्यांना तिने ते सांगितले. पालकांनी त्याला नकार दिल्यामुळे तरुणीनेही त्याचा प्रस्ताव नाकारला. तिने त्याच्यापासून अंतर राखणे सुरू केल्याने अतुल आक्रमक झाला. तो तिला वारंवार मेसेज फोन करू लागला. त्याला वारंवार समजावूनही तो ऐकत नव्हता. तरुणी जेथे कामाला आहे, तेथे जाऊन तो तिचा पाठलाग करू लागला. बदनामीच्या धाकाने तरुणीने गप्प राहणे पसंत केले. त्याचा त्रास वाढत असल्यामुळे घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे जोडण्याच्या हालचाली सुरू केल्या. एका तरुणाशी तिचे लग्न जवळपास पक्के होण्याच्या तयारीत असताना आरोपी अतुलने त्यात खोडा केला. आपले हिच्यासोबत प्रेमसंबंध आहेत, अशी थाप मारून त्याने तिची बदनामी करण्यासोबतच लग्नही तोडले.प्रकरणाला दुसरी बाजू?बुधवारी आरोपी अतुल तिच्या घरी गेला. त्याने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. आपल्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून तुला विद्रुप करेन आणि स्वत: आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. त्याच्यापासून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे अखेर तरुणीने कोराडी ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अतुलविरुध्द गुन्हा नोंदविला. या प्रकरणाला दुसरी बाजू असल्याचे पोलीस सांगतात. त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिला