शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ६२.७२ लाखाची वीजचोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:30 IST

नवा नकाशा येथील मोरयानी भवनातील बर्फ आणि शीतपेयाच्या कंपनीत वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच, वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने ६२ लाख ७२ हजार ४०५ रुपयंचा दंड ठोठावला. वीजचोरी प्रकरणात शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे.

ठळक मुद्देएसएनडीएलची कारवाई : मोरयानी भवनातील बर्फ कंपनीवर ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवा नकाशा येथील मोरयानी भवनातील बर्फ आणि शीतपेयाच्या कंपनीत वीजचोरी होत असल्याचे स्पष्ट होताच, वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने ६२ लाख ७२ हजार ४०५ रुपयंचा दंड ठोठावला. वीजचोरी प्रकरणात शहरातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दंड आहे.एसएनडीएलच्या चमूने वापरलेल्या विजेचे मूल्यांकन करून त्याच्या दंडाबाबतची प्रत मोरयानी परिवाराला दिली. परंतु त्यांनी ती प्रत स्वीकारली नाही. त्यामुळे एसएनडीएलने गुरुनानक प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या नावाने पोस्टाने असेसमेंटची प्रत पाठविली. यात असे म्हटले आहे की, एकूण ७४३९०० युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. यात १५ दिवसात पैसे न भरल्यास परिसरातील सर्व वीज कनेक्शन कापले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मोरयानी भवनाला वीजपुरवठा करणाऱ्या स्थानिक ट्रान्सफार्मरवर ८३ टक्के तोटा नोंदविण्यात येत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत असल्याचा संशय होता. पोलिसांच्या मदतीने एसएनडीएलच्या चमूने परिसरात धाड टाकली. मीटर रुमची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, मीटरला बायपास करून बर्फ बनवले जात आहे. फ्रीजिंग युनिटमध्ये जवळपास ५४ किलोवॅट लोड सापडला. बाहेरून बंद दिसणाºया या कारखन्यात गेल्या तीन वर्षांपासून वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले.जळालेले वीज मीटरही बदलवू दिले नाहीसन २०१५ मध्ये या परिसराच्या मालकाने तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या परिसरातील इंडस्ट्रीयल मीटर जळाले आहे. परंतु जेव्हा चमू मीटर बदलविण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना आत प्रवेश करू देण्यात आला नाही. एसएनडीएल नियमितपणे नोटीस देऊन मीटर बदलविण्यास सांगत राहिले. परंतु मीटर बदलविले गेले नाही.

 

टॅग्स :electricityवीजtheftचोरी