शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Nagpur: एटीएममध्ये ॲल्युमिनियम प्लेट फसवून करणाऱ्या चोरट्याला अटक, सीसीटीव्हीमुळे लागला पोलिसांच्या हाती

By योगेश पांडे | Updated: June 2, 2024 15:29 IST

Nagpur News: एटीएममध्ये ॲल्युमिनियम प्लेट फसवून येणारी रक्कम अगोदर अडकवून व त्यानंतर ग्राहक परतल्यावर ती रक्कम लांबविणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलेटवर जात हा आरोपी शहरातील एटीएम टार्गेट करायचा.

- योगेश पांडे नागपूर - एटीएममध्ये ॲल्युमिनियम प्लेट फसवून येणारी रक्कम अगोदर अडकवून व त्यानंतर ग्राहक परतल्यावर ती रक्कम लांबविणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलेटवर जात हा आरोपी शहरातील एटीएम टार्गेट करायचा. त्याने असा पद्धतीने आठहून अधिक एटीएममध्ये चोरी केल्याची बाब प्राथमिक चौकशीतून समोर आली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

कडबी चौक येथे बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम असून तेथे १ जून रोजी सकाळी एसएनजी ९०९० या आयडी क्रमांकाच्या मशीनमधील माऊथ शटर ॲसेम्ब्लीमध्ये छेडछाड झाल्याची बाब समोर आली. त्या एटीएममधून हजार रुपये काढण्यात आले होते. असाच प्रकार त्याच एटीएममध्ये २८ मे व ३० मे रोजीदेखील झाला होता. यावरून बॅंकेचे अधिकारी स्वप्निल मारोतराव गभने यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारचे पथक समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या माध्यमातून यात मयुर कायरकर हा सहभागी असल्याची माहिती मिळाली. तो एमएच ४९ सीई ७०७२ या क्रमांकाच्या बुलेटने मानेवाडा परिसरात फिरत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने जरीपटक्यात आणखी दोन, पाचपावलीत तीन व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी एटीएममध्ये अशा पद्धतीने चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक रमेश ताले, अविनाश जायभाये, सुनिल ठवकर, अतुल चाटे, आशीष क्षीरसागर, चेतन पाटील, देवेंद्र नवघरे, स्वप्नील अमृतकर, संदीप मावलकर, श्रीकांत मारवाडे, लिलाधर भेंडारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अशी करायचा आरोपी चोरीआरोपी ॲल्युमिनियमची पट्टी एटीएम मशीनमध्ये फसवायचा. जेथून पैसे बाहेर येतात तेथेच ती पट्टी फसवून तो एटीएम बाहेर जाऊन उभा रहायचा. ग्राहकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर ते पट्टीमुळे फसले रहायचे. त्यामुळे ग्राहक मशीनमध्ये पैसेच नाही असे समजून निघून जायचे. त्यानंतर मयुर आतमध्ये जाऊन पट्टी काढायचा व ती रोख रक्कम ओढून बाहेर काढायचा. त्याने अशा पद्धतीने अगोदर किती एटीएममध्ये चोरी केली आहे याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर