शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : जन आरोग्याचा निधी पडला कमी, तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:23 IST

हृदयशस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या २२ वर्षीय तरुणाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून मंजूर झालेल्या दीड लाखांचा निधी कमी पडला. नातेवाईकांनी पैसे गोळा करून संबंधित रुग्णालयाच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु लाभार्थी रुग्णाकडून पैसे घेण्यास योजनेच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. परीणामी, शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. सोमवारी त्या तरुणाचा शस्त्रक्रियेविनाच मृत्यू झाला. या घटनेने मृताच्या कुटुंबियांनी जन आरोग्य योजनेवरच आक्षेप घेतला. ही धक्कादायक, घटना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागातील असून मृताचे नाव अकेश लिमजे (२२) असे आहे.

ठळक मुद्देयोजनेतील मंजुर निधीपेक्षा जास्त निधीची होती गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदयशस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या २२ वर्षीय तरुणाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून मंजूर झालेल्या दीड लाखांचा निधी कमी पडला. नातेवाईकांनी पैसे गोळा करून संबंधित रुग्णालयाच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु लाभार्थी रुग्णाकडून पैसे घेण्यास योजनेच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. परीणामी, शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. सोमवारी त्या तरुणाचा शस्त्रक्रियेविनाच मृत्यू झाला. या घटनेने मृताच्या कुटुंबियांनी जन आरोग्य योजनेवरच आक्षेप घेतला. ही धक्कादायक, घटना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागातील असून मृताचे नाव अकेश लिमजे (२२) असे आहे.प्राप्त माहितीनुसार, अकेशला हृदय विकार असल्याचे निदान एका खासगी हॉस्पिटलमध्ये झाले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अकेशला १० जानेवारी रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. अकेश याच्याकडे दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशन कार्ड असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत त्याचे प्रकरण पाठविण्यात आले. १६ जानेवारी रोजी शस्त्रक्रियेसाठी योजनेतून दीड लाखांचा निधी मंजूर झाला. परंतु ‘क्रॉनिक अ‍ॅरोटिक डिसेक्शन’चा रुग्ण असल्याने दीड लाखापेक्षा आणखी एक लाख ८० हजाराचा निधीची गरज होती. या निधीतून आवश्यक असलेले ‘बायोग्लू’, ‘अ‍ॅरोटिक व्हाल्व कॉन्ड्यूलट्’ या सारखे आणखी काही महत्वाच्या साहित्याची गरज होती. या साहित्याशिवाय शस्त्रक्रिया करणे अशक्य होते. डॉक्टरांनी याची माहिती नातेवाईकांना दिली, आणि कमीत कमी आणखी ७५ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी पैसे गोळा केले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी यावर आक्षेप घेतला. रुग्णांकडून शस्त्रक्रियेला लागणारे वरचे पैसे घेता येणार नाही, असे सांगितले. यामुळे विभागाने शस्त्रक्रिया थांबवली. शस्त्रक्रियेचा खर्च हा दीड लाखांपेक्षा जास्त येत असल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसेही घेता येत नसल्याने काय करावे हा प्रश्न होता. परीणामी दोन ते तीन वेळा शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेली. अखेर सोमवारी अकेशचा विना शस्त्रक्रिया मृत्यू झाला. यावर अकेशचा मोठा भाऊ अतूल लिमजे यांनी जन आरोग्य योजनेने घेतलेल्या आक्षेपामुळे शस्त्रक्रिया टळली आणि भावाचा मृत्यू झालेचा आरोप केला. या संदर्भात अधिष्ठात्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयDeathमृत्यू