शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बसेसवर दगडफेक, हलबा समाजाचे आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:33 IST

हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहलबा समाजाला न्याय व स्वतंत्र विदर्भाची मागणीपॉम्प्लेट बसेसमध्ये टाकून अज्ञात युवक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पहिली घटना सोमवारी दुपारी १२.३५ वाजता घडली. बस क्रमांक एमएच/३१/एफसी/०४२४ चे चालक अरविंद खुडे आणि कंडक्टर सुभाष नारनवरे हे खरबी टी-पॉर्इंटवरून परत जयताळा बस पॉर्इंटकडे परत जात होते. गंगाबाई घाटसमोर बस थांबली. प्रवासी खाली उतरत असतानाच दोन बाईकवर आलेले चार युवक बससमोर उभे झाले. त्यातील एकाने बॅट काढून बससमोरील काचेवर जोरात प्रहार केला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराने विट फेकून मारली. काचा फोडल्यानंतर हलबा समाजाला न्याय द्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्य करा, अशी मागणी करणारे पॉम्प्लेट बसमध्ये टाकून ते युवक फरार झाले. तीन युवकांनी चेहºयावर कापड बांधलले होते तर एका युवकाचा चेहरा उघडा होता. बसची काच फोडल्यानंतर बसचे जवळपास ३५ हजार रुपयाचे नुकसान झाले. चालक बस घेऊन थेट कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचला. चालक खुडे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दुसरी घटना लकडगंज परिसरातील महावीर चौकात दुपारी १.३० वाजता घडली. चालक पंढरी साम्रतवार बस क्रमांक एमएच/४०/एफसी/०९४० ने प्रवासी घेऊन जात होते. त्यांच्या बससमोर बाईकवर आलेल्या सहा युवकांनी बॅट आणि दगड मारून बसच्या समोरची काच फोडली. त्याचवेळी आझमशहा चौकातही तिसरी बस क्रमांक एमएच ४०/बीजी/१०८१ च्याही काचा अज्ञात युवकांनी फोडल्या. त्यांचीही सारखीच मागणी होती.

 

टॅग्स :Halba Communityहलबा समाजagitationआंदोलन