शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव ट्रकची दोन दुचाकीचालकांना धडक : एकाचा मृत्यू दुसरा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:05 IST

भरधाव ट्रकचालकाने एका पाठोपाठ दोन दुचाकीचालकांना जोरदार धडक मारली. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा टोल नाका मार्गावर शुक्रवारी रात्री ११.३० ते ११.५० च्या दरम्यान हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देगिट्टीखदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकचालकाने एका पाठोपाठ दोन दुचाकीचालकांना जोरदार धडक मारली. त्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाभा टोल नाका मार्गावर शुक्रवारी रात्री ११.३० ते ११.५० च्या दरम्यान हा भीषण अपघात घडला.हरीओमनगर सुराबर्डीच्या परिसरात राहणारा उरफान अब्दुल्ला उरफान सिद्दीकी (वय २०) हा त्याच्या होंडा युनिकॉन (एमएच ३१/ डीवाय ०५४४) ने काटोल नाक्याकडून दाभा टोल नाक्याकडे जात होता. त्याला भरधाव ट्रकच्या चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे उरफान अब्दुलाचा करुण अंत झाला. काही अंतरावरच याच ट्रकचालकाने सय्यद सलीम सय्यद युसूफ (वय ४३, रा. राठोड ले-आऊट, अनंतनगर) यांच्या दुचाकीलाही जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी आरोपी ट्रकचालक पळून गेला. या भागातील मंडळींनी जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांना कळविण्यात आले. इरफान अब्दुला सिद्दीकी (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू