शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

Nagpur South-West Election Results : विजयाचा पंच, मतदारसंघातील हॅट्ट्रिक : मुख्यमंत्र्यांचा कार्याला मतदारांची पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:35 IST

Nagpur South-West Election Results 2019 : Devendra Fadnavis Vs Ashish Deshmukh, Maharashtra Assembly Election 2019

ठळक मुद्देजिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी विजय : पहिल्या फेरीपासूनच घेतली आघाडी

योगेश पांडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्वात ‘हायप्रोफाईल’ मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात मुख्यमंत्र्यांनी दिमाखदार विजय मिळवत विधानसभा गाठली. विधानसभा निवडणुकांतील मुख्यमंत्र्यांचा हा सलग पाचवा विजय असला तरी, या मतदारसंघातून त्यांनी अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. २००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून भाजपकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस हेच येथून उमेदवार आहेत व प्रत्येक वेळी त्यांनी येथून विजय मिळविला. यंदाचा विजय हा त्यांची येथून ‘हॅट्ट्रिक’ करणारा ठरला.

दक्षिण-पश्चिम नागपुरात भाजपचे देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे आशिष देशमुख यांच्यात प्रमुख लढत होती. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली व पहिल्याच फेरीपासून फडणवीस यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. या मतदारसंघात एकूण १४ टेबल होते व २७ मतमोजणीच्या फेऱ्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मतमोजणीच्या २८ फेऱ्या घ्याव्या लागल्या. पहिल्याच फेरीत त्यांनी ४ हजार ४४५ मते घेतली तर देशमुख यांना १,९७५ मते मिळाली. ही आघाडी त्यानंतर प्रत्येक फेरीनिहाय वाढतच गेली. दहाव्या फेरीअखेर मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मतांची संख्या ४२,२७८ इतकी झाली होती, तर देशमुख यांच्या खात्यात २२,६३९ मते होती. फडणवीसांचे मताधिक्य १९ हजार ६४८ वर पोहोचले होते. 
पंधराव्या फेरीअखेर फडणवीसांची मते ६० हजार ९३६ वर पोहोचली होती, तर देशमुख यांना ३६,१२० मते मिळाली होती. या फेरीअखेर मुख्यमंत्री २४ हजार ८१६ मतांनी आघाडीवर होते. विसाव्या फेरीनंतर मुख्यमंत्र्यांच्या खात्यात ८१ हजार ८२० मते होती, तर देशमुख यांना ४४ हजार ९७४ मते मिळाली होती. या फेरीअखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांचा विजय जवळपास निश्चितच झाला होता. पंचविसाव्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी एक लाख मतांचा टप्पा गाठला व त्यांच्याकडे ४५ हजार ४६५ मतांची आघाडी होती.अखेरच्या २८ व्या फेरीअखेर मुख्यमंत्र्यांना १ लाख ९ हजार २३७ मते मिळाली, तर देशमुख यांना ५९ हजार ८९३ मतांवर समाधान मानावे लागले. अशाप्रकारे पहिल्या फेरीपासून मिळविलेली आघाडी मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली व ४९ हजार ३४४ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. मतदारसंघात बसपला मागल्या वेळप्रमाणे कामगिरी करता आली नाही. परंतु बसपाचे विवेक हाडके यांनी ७ हजार ६४६ मते मिळविली. तर वंचित बहुजन आघाडीचे रवि शेंडे यांना ८ हजार ८२१ मते मिळाली. या मतदारसंघात पाचव्या क्रमांकाची मते ‘नोटा’ची ठरली. येथून तब्बल ३ हजार ६४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.मतदान घटल्यावरदेखील मुख्यमंत्र्यांवरच विश्वास२१ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरात ४९.८७ टक्केच मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत ६.५७ टक्क्यांची घट झाली होती. शहरातील बहुतांश मतदारसंघात अशीच स्थिती होती. नागपुरातील एकाही विजयी उमेदवाराला २५ हजारांपेक्षा जास्त आघाडीने विजय मिळविता आलेला नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभार व स्वच्छ प्रतिमेवर मतदारांनी विश्वास टाकला. जिल्ह्यातून सर्वात जास्त मताधिक्याने त्यांना विजय मिळवून दिला.मतदारसंघाकडे नियमित होते लक्ष२०१४ सालापासून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असली तरी, त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मागील पाच वर्षांत येथील विकास कामांचा नियमित आढावा घेत मतदारसंघात पक्षसंघटन मजबूतीवरदेखील भर दिला. शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले. शिवाय मतदारांशी त्यांनी ‘कनेक्ट’ कायम ठेवला होता. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात सर्वच जातीधर्माचे लोक राहतात. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मतदारसंघाच्या विकासावरच भर दिला. जातीपातींच्या चौकटीत त्यांनी विकासाला न अडकविता प्रत्येकाचे समाधान करण्यावरच भर दिला. ते नियमितपणे दक्षिण-पश्चिम नागपुरातील विकास कामांचा व संघटनेचा आढावा घेत होते. अनेकदा त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यालादेखील संबोधन केले व त्यांच्याकडून विविध बाबी जाणून घेतल्या होत्या.प्रचारासाठी केवळ दोनच सभामुख्यमंत्र्यांकडे राज्यभरातील प्रचाराची जबाबदारी असल्यामुळे ते स्वत:च्या मतदारसंघात प्रचाराला फारसे येऊ शकलेले नाहीत. प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत त्यांनी मतदारसंघात केवळ दोनच प्रचार सभा घेतल्या. टिंबर मार्केट व प्रतापनगर चौकाजवळील सभांव्यतिरिक्त प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गोपालनगर, स्वावलंबीनगर परिसरातून ‘रोड शो’ काढला होता. याव्यतिरिक्त मुख्यमंत्री प्रचाराला येऊ शकले नाही. संपूर्ण जबाबदारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे होती. मागील पाच वर्षांत दक्षिण-पश्चिम नागपुरात झालेली विकास कामे घेऊनच ते मतदारांपर्यंत गेले.विजय कार्यकर्त्यांना समर्पित : मुख्यमंत्रीदक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री ९च्या सुमारास निवडणूक अधिकाºयांकडून प्रमाणपत्र स्वीकारले. आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. या विजयात सर्वात मोठा वाटा आमच्या परिश्रमी कार्यकर्त्यांचा आहे. अपार कष्ट, सतत सरकार आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांनी काम केले. प्रत्येक कार्यकर्ता ‘देवेंद्र’ बनून ही निवडणूक लढत होता. म्हणूनच हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याला मी समर्पित करतो. माझ्याच पूर्वीच्या पाच वर्षांच्या कालखंडाशी मला स्पर्धा करायची आहे. विरोधी पक्षासह सर्वांची साथ घेत, आणखी भक्कम काम करण्यावर भर असेल. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मला सलग पाचव्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली. फार वेळ यंदा प्रचारात देऊ शकलो नाही. पण संपर्क कायम होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.हा विकासाच्या राजकारणाचा विजय : नितीन गडकरीमहाराष्ट्रात परत एकदा महायुतीचे सरकार येत आहे. यासाठी राज्यातील जनतेचे आभार व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या विजयासाठी अभिनंदन. हा विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. राज्याचा विकास आणखी वेगाने होईल व महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य होईल हा मला विश्वास आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम