शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सराफांची ‘एकल’ दुकाने उघडली, इतवारी मुख्य बाजार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 01:30 IST

दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने सराफा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. रेड झोनमुळे दोन महिन्यानंतर केवळ ‘स्टॅण्डअलोन’ अर्थात एकल दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारपासून नागपुरात पाच मोठे शोरूम आणि २५ लहानमोठी दुकाने सुरू झाली आहेत. उर्वरित दुकाने बंद आहेत. मंगळवारी २४ कॅरेट सोने ४७,५०० रुपये आणि चांदी प्रति किलो ४८ हजार रुपये भाव होते.

ठळक मुद्देरेड झोनमुळे सराफा व्यापारी अडचणीत : स्थानिक कारागीर संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने सराफा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. रेड झोनमुळे दोन महिन्यानंतर केवळ ‘स्टॅण्डअलोन’ अर्थात एकल दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारपासून नागपुरात पाच मोठे शोरूम आणि २५ लहानमोठी दुकाने सुरू झाली आहेत. उर्वरित दुकाने बंद आहेत. मंगळवारी २४ कॅरेट सोने ४७,५०० रुपये आणि चांदी प्रति किलो ४८ हजार रुपये भाव होते.रेड झोनमुळे इतवारी मुख्य सराफा बाजार आणि कमाल चौकातील दुकाने बंद आहेत. मात्र लक्ष्मीनगर येथील रोकडे ज्वेलर्स, शंकरनगर चौकातील दास ज्वेलर्स, करण कोठारी ज्वेलर्स शोरूम सुरू झाले असून खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. रोकडे ज्वेलर्सचे संचालक आणि सोना चांदी ओल कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, सराफा व्यापारी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास सज्ज आहेत. मनपा आयुक्तांनी दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.मार्च महिन्याच्या शेवट्या आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सराफा दुकाने बंद आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी मुहूर्त असलेले गुढीपाडवा, अक्षयतृतीया या सणांना सोने-चांदीची विक्री झालीच नाही. त्यातच लग्नसराई आणि इतर कार्य बंद असल्याने सोने खरेदी बंद आहे. त्यामुळे सराफा व्यावसायकांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय स्थानिक कारागिरांचा रोजगार हिरावला आहे. आता दुकाने सुरू करण्यासाठी १ जूनची वाट पाहावी लागेल. सुरू झालेल्या शोरूमचे संचालक शासनाच्या नियमांचे पालन करीत आहेत. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोव्हज दिले आहेत. बाजार सुरळीत होण्यासाठी किती दिवस लागतील, हे सांगणे कठीण आहे, पण लोकांनी नियमाचे पालन केले तरच बाजार सुरळीत होईल, अशी अपेक्षा सराफांनी व्यक्त केली.लॉकडाऊनच्या काळात अनेक सराफा व्यावसायिकांनी ऑनलाईन सोने खरेदीच्या आॅफर दिल्या होत्या. मात्र ग्राहकांना सोने प्रत्यक्ष हाताळण्याची सवय असल्याने अनेकांनी सराफा बाजार उघडल्यानंतरच सोने खरेदीला पसंती दिली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीयेला अनेक सराफांनी नियमित ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन केले होते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर