शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 20:55 IST

बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली.

ठळक मुद्देबंद काळात आंबेडकरी कार्यकर्त्यांची माणुसकी

आॅनलाईन लोकमतनागपूर : बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली. सीताबर्डीचे सर्व मार्केट बंद करण्यात आले, परंतु येथे असलेले औषधाचे दुकान बंद होऊ दिले नाही. दुसरीकडे मेडिकल चौकातील सर्वच्या सर्व मेडिकल शॉप दिवसभर सुरळीत सुरू ठेवण्यात आले. रुग्णालये आणि इतर वैद्यकीय प्रतिष्ठानांनाही कुठलाही त्रास कार्यकर्त्यांनी होऊ दिला नाही.कार्यकर्त्यांनी दमदाटी करून बंद ठेवण्याची सूचना केली व इशाराही दिला. कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे व्यावसायिकांनी  आपली दुकाने बंद केली. मेडिकल चौकात कार्यकर्त्यांची रॅली निघल्यानंतर भीतीमुळे दुकाने बंद करण्यात येत होती. यावेळी मेडिकल शॉप चालकांनीही भीतीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले. औषधांची दुकाने सुरू राहू द्या असे सांगितले. मेडिकल चौकात दारूचे दुकान बंद करताना शेजारचे मेडिकल शॉप सुरळीत सुरू होते. सीताबर्डी मार्केट परिसरातही असाच अनुभव आला. शेकडो कार्यकर्ते मार्केटमध्ये घुसले व घोषणा देत सुरू असलेली दुकाने बंद केली. परंतु येथे असलेली फार्मसी मात्र याला अपवाद ठरली. त्यामुळे सर्व मार्केट बंद असताना येथे असलेले औषधाचे दुकान मात्र सुरू राहू देण्यात आले. तुकडोजी चौकात सुपर हॉस्पिटलसमोरील औषधीचे दुकानेही कार्यकर्त्यांनी सुरू राहू दिली. शहरात ठिकठिकाणी हाच अनुभव येत होता. सर्व रुग्णालये आणि आपत्कालीन व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहतील याची काळजी घेतली.

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद