शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह

By योगेश पांडे | Updated: June 18, 2023 22:25 IST

परिसरातीलच कारमध्ये अडकल्याचा संशय :

नागपूर : रविवारचा दिवस नागपुरातील समाजमन हादरविणारा ठरला. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फारुखनगरमधून शनिवारी बेपत्ता झालेल्या दोन लहान मुली व एका मुलाचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या घराजवळील परिसरातच उभ्या असलेल्या एका कारमध्ये हे मृतदेह आढळले. यामुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारमध्ये खेळता खेळता ते अडकल्याचा संशय वर्तविण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता.

आलिया फिरोज खान (वय ६), आफरीन इर्शाद खान (वय ६) आणि तौसिफ फिरोज खान (वय ४), अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. फारुखनगरच्या मोहम्मदिया मस्जिदजवळ राहणारी ही तीन मुले शनिवारी दुपारी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी आजूबाजूच्या भागांमध्ये शोध घेतल्यावरदेखील न आढळल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनीदेखील विविध माध्यमांतून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरदेखील पोलिसांनी माहिती प्रसारित केली. रविवारी दुपारनंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या माध्यमातून शोध सुरू केला. त्यावेळी एका वाहनाजवळ श्वानाने इशारा दिला. पोलिसांनी कार उघडून पाहिली असता त्यात तिघेही निपचित पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे परिसरात शोककळा पसरली होती.

पोलिसांचा फौजफाटा तैनातफारुखनगर भागात ही घटना वाऱ्यासारखी पसरली व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळाजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन, उपायुक्त गोरख भामरे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यताया मुलांचा नेमका मृत्यू कसा झाला याबाबत विविध कयास लावण्यात येत आहे. घटनास्थळाजवळ राहणारे रहिवासी व पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कार काही दिवसांपासून या मुलांच्या घराजवळच उभी होती. खेळता खेळता मुले आत गेली व लॉक झाल्याची शक्यता आहे. गरमीमुळे कारच्या आतील तापमान वाढले असावे व त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. कारच्या काचांना काळी फिल्म असल्याने बाहेरून लोकांना मुले दिसली नसतील व त्यांचा आवाजदेखील बाहेर येऊ शकला नसेल. दरम्यान, लॉक नव्हती का व वर्दळीचा भाग असताना मुले आत कशी गेली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसcarकार