शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

नागपूर - सावनेर मार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:09 IST

भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देमृतात पती-पत्नीचा समावेशपाटणसावंगीजवळ कारची दुचाकीला धडक, दोघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला तर कारचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले. हा अपघात सावनेर-नागपूर मार्गावरील पाटणसावंगीजवळील टोलनाक्याजवळ दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास झाला.धनराज रघुनाथ विश्वकर्मा (५०, रा. देवीनगर, वाठोडा, नागपूर) आणि सुनीता धनराज विश्वकर्मा (४४) असे मृत पती-पत्नीचे तर राजेश ऊर्फ राजू तिवारी, रा. होशंगाबाद असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमींमध्ये किशोर इंगळे (३४, रा. मूर्तिजापूर) आणि यास्मिन शेख बन्नू (३२, रा. नागपूर) या दोघांचा समावेश आहे.सुनीता यांच्या मोठ्या भावाच्या मुलीचे मुलताई येथे गुरुवारी लग्न होते. त्यासाठी धनराज आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघेही एमएच-४९/एएफ -०७८७ क्रमांकाच्या मोटरसायकलने मुलताई येथे बुधवारी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते दोघेही मुलताई येथून नागपूरला परत येत होते. त्याचवेळी एमपी-०४/टीबी-०९७१ क्रमांकाच्या कारने किशोर इंगळे, यास्मिन हे येत होते. पाटणसावंगी टोलनाक्याजवळ या भरधाव कारने धनराज यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली. अपघातामुळे कार अनियंत्रित होऊन पुलाच्या भिंतीवर आदळली. या अपघातात मोटरसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक राजूसह किशोर आणि यास्मिन असे तिघे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. कारमधील तिन्ही जखमींना अ‍ॅम्बुलन्सने मेयोकडे रवाना केले. तेथे उपचार सुरू असताना कारचालक राजीवचा मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.मृत धनराज यांचे नागुपरातील आशीर्वादनगरात इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. तर यास्मिन ही लग्नसमारंभ, कार्यक्रम घेणे यासारखे इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करतात. अशाचप्रकारे छिंदवाडा येथे लग्न समारंभाची पूर्ण जबाबदारी पार पाडून ते नागपूरकडे येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.जखमींवर उपचारया अपघातात जखमी झालेली यास्मिन ही इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते तर किशोर हा मूर्तिजापूर येथेच एका औषध कंपनीत सुपरवायजर म्हणून काम करतो. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने तो नेहमी बाहेरगावी जात असतो. अशाप्रकारे तो छिंदवाडा येथे गेला. तेथे त्याची मैत्रीण यास्मिनसोबत भेट झाली. दोघांनाही नागपुरात यायचे असल्याने त्यांनी खाजगी कार किरायाने करून नागपूरसाठी यायला निघाले, अशी माहिती त्याने पोलीस बयाणात दिली. दोन्ही जखमींवर नागपुरातील वेगवेगळ्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू