शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

नागपूरच्या सदर पोलिसांवर सूडबुद्धीचा आरोप : हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 8:16 PM

सदर पोलिसांवर सूडबुद्धीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शासनाला मागितले उत्तर

आॅनलाईन लोकमतनागपूर : सदर पोलिसांवर सूडबुद्धीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.गेल्या १७ आॅक्टोबर रोजी सदर पोलिसांनी संजय मिश्रा यांच्या तक्रारीवरून हिरा लक्ष्मी अ‍ॅन्ड कंपनीचे प्रोप्रायटर वेदप्रकाश ऊर्फ अप्पू वाधवानी व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ३८७ व १२०-ब अंतर्गत एफआयआर नोंदविला. ही कारवाई सूडबुद्धीच्या भावनेतून करण्यात आल्याचा दावा वाधवानी यांनी केला आहे. तसेच, हा एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने शुक्रवारी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाधवानी यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करण्यास मनाई केली आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस आयुक्त, सदर पोलीस निरीक्षक व संजय मिश्रा यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.मिश्रा यांनी १९९४ मध्ये वाधवानी यांच्याकडून ३३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी मिश्रा यांची कोऱ्या स्टॅम्प पेपपरवर स्वाक्षरी घेण्यात आली होती. त्यानंतर त्या स्टॅम्प पेपरचा दुरुपयोग करून मिश्रा यांची जमीन बळकावण्यात आली असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. वाधवानी यांनी हा एफआयआर वाईट हेतूने नोंदविण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिश्रा यांच्यासोबतचा वाद आधीच संपला आहे. मिश्रा यांनी स्वत: याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय निर्माण होतो असे वाधवानी यांनी स्पष्ट केले आहे. वाधवानी यांच्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPolice Stationपोलीस ठाणे