शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओ : लायसन्सचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:45 IST

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.

ठळक मुद्दे‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊन आलेले रिकाम्या हाताने परतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत असल्याच्या समस्या वाढल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी दुपारी १ वाजता आरटीओमधील शिकाऊ वाहन परवान्यांचे (लर्निंग लायसन्स) कामकाज चालणारी प्रणाली अचानक बंद पडली. परिणामी, तिन्ही कार्यालयामधील सुमारे ३००वर उमेदवारांना ‘ऑनलाईन अपॉईंटमेन्ट’ घेऊनही खाली हात परतावे लागले.राज्यांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘सारथी’ व ‘वाहन’ या संगणक प्रणालींद्वारे जोडण्यात आले आहे. या दोन्ही संगणक प्रणाली तयार करण्याचे काम हैदराबाद येथील ‘एनआयसी’ने केले आहे. तसेच या प्रणालींचे नियंत्रण व देखभाल, दुरुस्तीचे कामही ‘एनआयसी’ पाहते. परवाना संदर्भातील सर्व कामे ‘सारथी’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. तर, वाहनांसंदर्भातील सर्व कामे ‘वाहन’ या संगणक प्रणालीद्वारे केली जातात. देशातील कोणत्याही नागरिकाला वाहनचालक परवाना काढण्यासाठी ‘सारथी’ या संगणक प्रणालीवरच ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच सुरुवातीला शिकाऊ परवान्यासाठी अपॉईंटमेन्ट घ्यावी लागते. त्यानंतर अपॉईंटमेन्टच्या दिवशी संबंधित ‘आरटीओ’मध्ये जाऊन ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असते. मात्र, सोमवारी दुपारी ‘सारथी’ या संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड आला. हा बिघाड लवकरच दूर होईल, असे संबंधित अधिकारी सांगत होते. परंतु सायंकाळचे ५ वाजूनही बिघाड दूर न झाल्याने तिन्ही कार्यालये मिळून साधारण ३००वर उमेदवारांना शिकाऊ परवान्यासाची परीक्षा न देताच खाली हात परतावे लागले. ही समस्या राज्यातील इतरही आरटीओ कार्यालयांना जाणवल्याचे समजते.कधी सुरू होणार? उत्तर कुणाकडेच नाहीप्रणाली ठप्प पडल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी ‘एनआयसी’शी संपर्क साधला. संगणकीय यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. परंतु बिघाड कधी दुरुस्त होणार, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. यामुळे दिवसभर ऑनलाईन परीक्षेच्या प्रतीक्षेत बसलेल्यांसामोर अपॉईंटमेन्ट कधीची घ्यावी, हा प्रश्न कायम होता.बाहेर खासगीत प्रणाली सुरू, कार्यालयात ठप्पआरटीओ कार्यालयाच्या बाहेर खासगीत ऑनलाईन सेंटर चालविणाऱ्यांकडे ही प्रणाली धडाक्यात सुरू होती. परंतु आरटीओ कार्यालयातच ही प्रणाली बंद होती. यामुळे नागरिकांमध्ये शंकेचेही वातावरण निर्माण झाले होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर