शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नागपूर आरटीओ ; बदलीनंतरच्या पदस्थापनेला अधिकारीच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 21:10 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ते तीन महिन्यावर कालावधी होत असतनाही ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. विशेषत: रस्त्यावरील वाहन तपासणीची मोहीमही थंडावली आहे.

ठळक मुद्देनऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या : वाहन तपासणी व इतरही कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ते तीन महिन्यावर कालावधी होत असतनाही ही पदे रिक्त असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. विशेषत: रस्त्यावरील वाहन तपासणीची मोहीमही थंडावली आहे.आरटीओ कार्यालयात ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ वेब बेस प्रणाली सुरू झाल्याने नागरिकांना घरी बसून विविधअर्ज भरणे, ई पेमेंट करणे शक्य झाले आहे. यात आरटीओच्या चकरा मारणेही कमी झाले असले तरी प्रत्यक्ष कामासाठी उमेदवारांना कार्यालय गाठावेच लागते. कार्यालयात वाहन परवाना, परमीट, वाहनांचे पासिंग यासह इतरही कामांसाठी शेकडो लोक येतात. त्यांचा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि कामाच्या पूर्ततेसाठी सर्वात मोठी जबाबदारी सहायक मोटर वाहन निरीक्षकांची असते. आरटीओ कार्यालयाचे ते ‘कणा’ असल्याचेही बोलले जाते. मात्र या अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आरटीओत आधीच कामाचा बोजवारा उडाला आहे. यातच सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करून शासनाने बदलीच्या जागांवर कुणीच पाठविले नसल्याने रोजची कामे प्रभावित झाली आहेत. विशेष म्हणजे, प्रलंबित कामांची संख्या वाढली आहे.शहर कार्यालयात पाच सहायक निरीक्षकांची पदस्थापना नाहीनागपूर शहर आरटीओ कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक सागर पाटील, मंगेश राठोड, अभिजित खरे व संजीवनी चोपडे यांची शासनाच्या विविध आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या. परंतु त्यांच्या जागेवर कुणीच आले नाही. यातच सहायक मोटार वाहन निरीक्षक मिथुन डोंगरे हे गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. यामुळे त्याचेही पद रिक्तआहे.ग्रामीणमधील तीन तर पूर्व आरटीओतील एक पदही रिक्तनागपूर ग्रामीण आरटीओतील सहायक मोटार वाहन निरीक्षक किरण डोंगरे, रवींद्र नराडे व वृद्धी चाऊस यांच्या बदल्या झाल्या, परंतु त्यांच्याही जागी कुणीच आले नाही. या दोन कार्यालयाच्या कामकाजाचा व्याप पाहता तातडीने सहायक निरीक्षक देणे आवश्यक असताना तीन महिन्यावर कालावधी लोटूनही सहायक निरीक्षक नेमण्यात आले नाही. यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर