शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

नागपूर आरटीओ : ३०९ स्कूल बसला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:50 IST

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७१७ स्कूल बस व व्हॅन फेरतपासणीसाठी हजर झाल्या. उर्वरित ३०९ स्कूल बसेस तपासणीला आल्याच नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देफेरतपासणीसाठी आलेच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७१७ स्कूल बस व व्हॅन फेरतपासणीसाठी हजर झाल्या. उर्वरित ३०९ स्कूल बसेस तपासणीला आल्याच नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्कूल बसची फिटनेस चाचणी घेण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध आहे, त्यांनासुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्कूल बस फेरचाचणीकरिता सादर करणे बंधनकारक केले. फेरतपासणीत वाहनात दोष आढळून आल्यास दोषाचे निराकरण केल्यानंतर वाहन तपासणीसाठी पुन्हा सादर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. फेरचाचणीचा कालावधी ३ मे ते ६ जूनपर्यंत होता. परंतु नंतर तो १६ जूनपर्यंत वाढविण्यात आला. नागपूर शहर आरटीओअंतर्गत येणाऱ्या स्कूल बस व व्हॅनची संख्या ८५६ आहे. यातील ७१७ वाहने फेरतपासणीस आली, उर्वरित १३९ वाहने तपासणीसाठी आलीच नाहीत. नागपूर ग्रामीण आरटीओअंतर्गत १६२० स्कूल बस व व्हॅनची संख्या आहे. यातील १४५० वाहने तपासणीसाठी आली, तब्बल १७० वाहने अद्यापही तपासणीपासून दूर आहेत. तपासणीसाठी न आलेल्या ३०९ वाहनांना नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच या वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.फेरतपासणी न झालेल्या वाहनांवर कारवाईवाढीव मुदत देऊनही फेरतपासणीसाठी न आलेल्या स्कूल बस व व्हॅन चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाईची मोहीमही हाती घेतली जाईल.श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण)

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसStudentविद्यार्थीSchoolशाळाPublic Transportसार्वजनिक वाहतूक