शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' काळरात्रीचा अनुभव, कुणाचा दावा खरा?; स्थानिक अन् पोलिसांच्या दाव्यात तफावत

By योगेश पांडे | Updated: March 21, 2025 21:49 IST

पोलिसांचा दावा, हंसापुरीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला, प्रत्यक्षदर्शी- आमदारांच्या दाव्याशी विसंगती : पोलीस वेळेत पोहोचल्याचीदेखील भूमिका

योगेश पांडे नागपूर - हंसापुरी परिसरात सोमवारच्या रात्री मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली व अनेकांच्या घरावरदेखील दगडफेक करण्यात आली. संबंधित हल्ला एकाच गटाच्या तरुणांकडून करण्यात आल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला होता व रात्रभर ते दहशतीतच होते. मात्र पोलिसांनी वेगळाच दावा केला आहे. हंसापुरीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला करत दगडफेक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातदेखील तेच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता पोलिसांचा दावा खरा की स्थानिक रहिवाशांनी अनुभवलेला काळरात्रीचा अनुभव खरा असा सवाल उपस्थित होत आहे.

हंसापुरीतील जाळपोळ व हिंसाचार प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडूनच या गुन्ह्यात तक्रार करण्यात आली आहे. गुन्ह्यातील तपशीलानुसार रात्री दहा वाजता फोन आल्यानंतर पोलिसांचे पथक हंसापुरीकडे रवाना झाले. तेथे एका गटाचे ४० तरुण तर दुसऱ्या गटाचे दीडशेहून अधिक तरुण एकमेकांवर दगडफेक करत होते. एका तरुणाला दुसऱ्या गटाने घेरून बेदम मारहाण केली व पोलिसांनी त्याला उपचारासाठी लगेच मेयो इस्पितळात पाठविले. तसेच होमगार्ड विपुल सोनवणे व आदर्श बगले यांना मारहाण करून त्यांच्या दुचाकी जाळल्या. पोलिसांनी या प्रकरणात दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्ह्यातील दावा प्रत्यक्षदर्शींच्या दाव्याशी मेळ खात नसल्याचे दिसून येत आहे.

तहसील पोलीस ठाण्यातून बराच वेळ मदतच मिळाली नव्हती असा आरोप स्थानिक रहिवासी तसेच भाजपचे आ.प्रवीण दटके यांनी केला होता. मात्र दाखल गुन्ह्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी वेळेत पोहोचले होते असे नमूद आहे. त्याचप्रमाणे एकाच गटाकडून हल्ला केल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी मात्र दोन्ही गटांकडून हल्ला झाल्याची भूमिका मांडली आहे.

सीआयएसएफच्या असिस्टंट कमांडंटलादेखील फटकादरम्यान, सोमवारच्या दंगलींमध्ये सीआयएसएफच्या असिस्टंट कमांडंटलादेखील फटका बसला आहे. विकासकुमार झा असे त्यांचे नाव असून ते घटनेच्या वेळी युपी १६ जी ०८७५ या वाहनाने तेथून जात होते. भगवाघर चौकात जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक करत तोडफोड केली.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस