शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त पोलीस हवालदाराने मृत्यूनंतरही बजावले समाजाप्रति कर्तव्य, पत्नी, मुलींनी दिली अवयवदानाची संमती

By सुमेध वाघमार | Updated: May 20, 2024 22:18 IST

Nagpur: कर्तव्यावर असताना पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते.  नागरिकांना सुरक्षित ठेवणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. याच कर्तव्यातून एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतरही समाजाचे भान राखत अवयवदान केले. त्यांच्या या दानामुळे तीघांना नवे आयुष्य मिळाले. लवकरच दोघांना दृष्टी मिळणार आहे. 

- सुमेध वाघमारे नागपूर - कर्तव्यावर असताना पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते.  नागरिकांना सुरक्षित ठेवणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. याच कर्तव्यातून एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतरही समाजाचे भान राखत अवयवदान केले. त्यांच्या या दानामुळे तीघांना नवे आयुष्य मिळाले. लवकरच दोघांना दृष्टी मिळणार आहे.   चंद्रपूर येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस हवालदार अरुण भटवलकर (६०) त्या अवयवदात्याचे नाव. काही दिवसांपूर्वी घरी असताना अचानक त्यांना उलट्या होऊ लागल्यात. भोवळ येऊन ते खाली पडले. लागलीच त्यांना चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती खालवत असल्याचे पाहत त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात नंतर तेथून त्यांना न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारानंतरही त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांच्या एका चमूने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ घोषीत केले. याची माहिती त्यांच्या पत्नी मधुरी व पाच मुलींना दिली. सोबतच अवयवदानाविषयी समुपदेशन केले. अचानक झालेल्या या घटनेने त्यांना धक्का बसला. मात्र त्या दु:खातही त्यांचा पत्नी आणि मुलींनी अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) याची माहिती देण्यात आली. त्यांनी प्रतिक्षा यादीनुसार दोन्ही किडनी, यकृत व कॉर्नियाचे दान केले.

६७ वर्षीय रुग्णाला जीवनदानकिडनी निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत जगणाºया ६७ वर्षीय पुरुष रुग्णाला किडनी दान करून जीवनदान देण्यात आले. दुसरी किडनी न्यू इरा हॉस्पिटलमधील ४३वर्षीय महिलेला दान करण्यात आली. तर यकृत याच हॉस्पिटलमधील ५० वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले. कॉर्निआ मेडिकलला दान करण्यात आले.आतापर्यंत १५१ ब्रेन डेड व्यक्तीचे अवयवदाननागपुरात अवयवदानाची चळवळ २०१३पासून सुरू झाली. हे १५१ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीचे अवयवदान होते. राज्यात नागपूर हे अवयवदानात पुणे, मुंबई नंतर तिसºया क्रमांकावर आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरOrgan donationअवयव दानPoliceपोलिस