शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय : मनोरुग्णांची थंड पाण्याने अंघोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:00 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. आता पुन्हा १३ सोलर वॉटर हिटर सिस्टीमधून केवळ एकच सुरू आहे. यामुळे रुग्णांवर पुन्हा थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन लाकडे जाळून गरम पाणी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे१३ सोलर वॉटर हिटरमधून एकच सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. आता पुन्हा १३ सोलर वॉटर हिटर सिस्टीमधून केवळ एकच सुरू आहे. यामुळे रुग्णांवर पुन्हा थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन लाकडे जाळून गरम पाणी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे, यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चारमनोरुग्णालयाची स्थापना केली. मात्र येथील उपचार व सोयींना घेऊन ही सर्वच रुग्णालये नेहमीच चर्चेत राहिली आहेत. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे, यासाठी पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून आठ सोलर वॉटर हिटर सिस्टीम लावण्यात आले. पुण्याच्या एका कंपनीकडे याच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली. परंतु नंतर याकडे लक्षच देण्यात आले नसल्याने सर्वच बंद पडले. दोन वर्षांपूर्वी पाच नवे सोलर वॉटर हिटर सिस्टीम लावण्यात आले. मात्र सध्या यातील एकच सुरू आहे. यामुळे अंघोळीसाठी लागणाऱ्या गरम पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून लाकडे जाळून गरम पाणी केले जाते, परंतु रुग्णांची संख्या पाहता सर्वांनाच गरम पाणी देणे कठीण जात असल्याचे चित्र होते.दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. हिवाळी अधिवेशनात यावर तारांकित प्रश्नही उपस्थित झाला. अखेर याची दखल शासनाने घेतली. नागपूरसह इतर चारही मनोरुग्णालयांकरिता एकूण २४ नग सोलर वॉटर हिटर सिस्टीमला मंजुरी दिली. याला अंदाजित खर्च ८४ लाख २४ हजार येणार असून, लवकरच खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यातील सुमारे सहा नग नागपूरच्या मनोरुग्णालयाला मिळण्याची शक्यता होती. परंतु नंतर त्याचे काय झाले, याची माहिती कुणालाच नाही. रुग्णालयाचे नवे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी पदभार स्वीकारताच रुग्णालयातील सोलर सिस्टीमची पाहणी करून दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीला सूचना दिल्याचे समजते.रुग्णालयातील आठ जुने व पाच नवे सोलर वॉटर हिटर सिस्टीममधून केवळ एक सुरू आहे. रुग्णांना लाकडे जाळून गरम पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक रुग्ण गरम पाण्यानेच अंघोळ करीत आहे. बंद पडलेली सोलर यंत्रणा दुरुस्त करण्याचा सूचना दिल्या आहेत.माधुरी थोरातवैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

 

 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर