शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

नागपूर रेड झोन मध्येच : आजपासून नवीन आदेश अंमलात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:47 IST

महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महापालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देमार्केट, मॉल्स आणि खाजगी कार्यालये राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महापालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली.नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त स्टॅन्डअलोन स्वरूपातील दुकाने (ती ही एका ओळीत जीवनावश्यक सेवेशी संबंधित दुकाने वगळता जास्तीत जास्त पाच) सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.महाराष्ट्र शासनातर्फे १९ मे रोजी निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती त्यांनी आयुक्तांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार गुरूवारी रात्री उशीरा निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.आता शहरात खाजगी कार्यालये बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेशी संबंधित शासकीय /निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालये केवळ ५ टक्के कर्मचारी क्षमतेसहच तसेच जास्ती दहा कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहणार आहेत.यापूर्वी १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार स्टॅन्डअलोन स्वरूपात इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरूस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे परवानगी देण्यात आली होती. परंतू आता यामध्ये बदल होणार असून दिवसाचे वर्गीकरण हटविण्यात आले आहे. तसेच स्टॅन्डअलोन स्वरूपातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार आहे.प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने फक्त सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत 'नाईट कर्फ्यू'नवीन आदेशानुसार शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजतापर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाईट कर्फ्यूच्या काटेकोर पालना संबंधी पोलीस प्रशासनालाही आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईसुद्धा पोलीस विभागामार्फत होणार आहेप्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही शिथिलता नाहीप्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवेला परवानगी देण्यात आली नाही. प्रतिबंधित क्षेत्रामधून कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरीला व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.निर्गमित करण्यात आलेली मानक कार्यप्रणालीसार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारकसार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी थुंकल्यास दंडसार्वजनिक ठिकाणी आणि वाहतूक साधनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्यलग्न समारंभामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त ५० लोकांना परवानगीअंत्यविधी प्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू नयेसार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींच्या सेवनाला बंदीदुकानांमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाहीशहरात काय सुरूमद्यालये (केवळ घरपोच विक्री)वस्तू पुरवठाउद्योगधंदे (फक्त अत्यावश्यक वस्तू)जीवनावश्यक वस्तूंची दुकानेएकल स्वरुपाची दुकाने (मर्यादित)ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू)ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू वगळून)बँक व फायनान्सकुरियर, डाक सेवाघरपोच रेस्टॉरंट सेवाआरटीओशहरात काय बंदशैक्षणिक संस्थाहॉटेल्स, रेस्टॉरंट्सशॉपिंग मॉलप्रार्थनास्थळेटॅक्सी, कॅब, रिक्षाजिल्हाअंतर्गत बस सेवाखासगी बांधकामखासगी कार्यालयसलून, स्पाकृषी विषयक कार्यस्टेडियम प्रेक्षकांविना(प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय सेवा, वस्तूंचा पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व बंद)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर