शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर- रामटेक मार्गावरील  टोल नाका बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:57 IST

नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे निर्णय घेण्यासाठी नेमली समिती : गडकरींच्या दिल्लीतील बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती अभ्यासानंतर महिनाभरात आपला अहवाल देईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एनएचएआयचे सचिव, भाजपा नेते विकास तोतडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. रामटेक पथकर नाका बंद करण्याची रामटेक आणि नागपूरवासीयांची दीर्घ काळापासूनची मागणी आहे. या पथकर नाक्यामुळे रामटेकवरून नागपूरला येणाऱ्या व नागपूरवरून रामटेकला जाताना पथकर द्यावा लागत आहे. या पथकराला नागरिकांनी विरोध केला होता.मध्यंतरीच्या काळात हा पथकर नाका बंद व्हावा म्हणून नागरिकांनी आंदोलनेही केली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पथकर बंद करण्यासंदर्भात निवेदनेही पाठविण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत या बैठकीचे आयोजन केले होते.कन्हानचा पूलही बांधणार रामटेक मार्गावरच कन्हान नदीवरील जुना पूल अतिशय जीर्ण झाला असून कधीही कोसळण्याची भीती आहे. या मार्गावर ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. जुना पूल इंग्रजांच्या काळातील असून शंभर वर्षापेक्षा अधिक काळ या जुन्या पुलाला झाला आहे. या मार्गावर नवीन चार पदरी पूल लवकरात लवकर उभारला जावा अशी नागरिकांची मागणी असून लवकरच हा पूलही केला जाणार आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाnagpurनागपूर