शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वेने प्रवाशांना परत केले २१.५८ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:15 IST

मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण केलेल्या तिकिटांचे पैसे अडकून पडले होते. त्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाने आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकिटांची रक्कम परत करणे सुरू केले आहे.

ठळक मुद्दे३२०७ तिकिटे रद्द : पैशासाठी नागरिकांनी लावल्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण केलेल्या तिकिटांचे पैसे अडकून पडले होते. त्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाने आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकिटांची रक्कम परत करणे सुरू केले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सोमवारी ३,१४३ तिकिटे तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ६४ तिकिटे रद्द करून २१,५८,२६५ रुपये परत केल्याची नोंद करण्यात आली आहे. तिकिटांची रक्कम परत घेण्यासाठी नागरिकांनी आरक्षण केंद्राच्या बाहेरपर्यंत रांगा लावल्या होत्या.कोरोनामुळे २२ मार्चपासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. बहुतांश प्रवाशांनी ३ महिने आधीच आरक्षणाची तिकिटे खरेदी केली होती. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेचे आरक्षण कार्यालयही बंद करण्यात आले होते. परंतु रेल्वेने आरक्षणाच्या तिकिटांची १०० टक्के रक्कम आरक्षण कार्यालय सुरू झाल्यानंतर परत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २५ मे रोजी पहिल्याच दिवशी ३,१४३ तिकिटे रद्द केली. या रद्द केलेल्या तिकिटांच्या मोबदल्यात रेल्वेला २१,०८,४८० रुपये परत करावे लागले. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २५ मे रोजी ९ आरक्षण केंद्रावरून ६४ तिकिटे रद्द करून प्रवाशांना ४९,७८५ रुपये परत केले आहेत. तीन महिन्यांपासूून तिकिटांचे पैसे अडकल्यामुळे प्रवाशांकडून हे पैसे कधी परत करण्यात येतील, अशी सातत्याने विचारणा होत होती. आता रेल्वेने तिकिटांची रक्कम परत करणे सुरु केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.अशी होईल तिकिटांची रक्कम परत२२ ते ३१ मार्चपर्यंतच्या तिकिटांची रक्कम २६ मेपासून१ ते १४ एप्रिलपर्यंतच्या तिकिटांची रक्कम १ जूनपासून१५ ते ३० एप्रिलपर्यंतच्या तिकिटांची रक्कम ७ जूनपासून१ ते १५ मेपर्यंतच्या तिकिटांची रक्कम १४ जूनपासून१६ ते ३१ मेपर्यंतच्या तिकिटांची रक्कम २१ जूनपासूून१ ते ३० जूनपर्यंतच्या तिकिटांची रक्कम २८ जूनपासून

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट