शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नागपूर रेल्वेस्थानक : दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:46 IST

दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या  तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या  तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक हरीवंश सिंह, जसवीर सिंह, शेख शकील, अश्विनी मुळतकर हे शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या एस ११ कोचमध्ये त्यांना तीन महिला चार बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणले. त्यांनी आपले नाव सुनिता किशोर जाट (३६), अल्का नरेश जाट (४५), सीमा जितेंद्र जाट (४६) रा. हमापुर, जबलपूर असे सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशावरून कागदोपत्री कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर