शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून जनता खाना बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:07 IST

महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून केवळ २० रुपये शुल्क आकारून जनता खाना पुरविण्यात येत होता. परंतु ‘आयआरसीटीसी’ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन) सुरू केलेल्या जनाहारमध्ये जनता खाना उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची पाळी येत आहे.

ठळक मुद्देगरीब प्रवाशांची गैरसोय२० रुपयात मिळत होते भोजन

ऑनलाईन लोकमत नागपूर : महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून केवळ २० रुपये शुल्क आकारून जनता खाना पुरविण्यात येत होता. परंतु ‘आयआरसीटीसी’ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन) सुरू केलेल्या जनाहारमध्ये जनता खाना उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची पाळी येत आहे.रेल्वे बोर्डाने देशातील सर्व रेल्वेस्थानकावरील बेस किचनचा ताबा ‘आयआरसीटीसी’ला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावरील बेस किचनही ‘आयआरसीटीसी’कडे सोपविण्यात आले. बेस किचनच्या अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर जनाहार उपहारगृह चालविण्यात येते. पूर्वी जनाहार रेल्वेच्या अखत्यारित असताना येथे २० रुपयात प्रवाशांना जनता खाना उपलब्ध करून देण्यात येत होता. यात प्रवाशांना आलूची भाजी, लोणचे आणि आठ पुरी देण्यात येत होते. एका प्रवाशाचे भोजन या जनता खानात व्हायचे. परंतु आयआरसीटीसीने जनाहार उपहारगृहाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी जनाहारमध्ये जनता खाना मागण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना रिकाम्या हाताने परतण्याची पाळी आली. गोरगरीब प्रवाशांसाठी जनता खाना एक मोठा आधार ठरत असताना जनाहारमध्ये पहिल्याच दिवशी जनता खाना न मिळाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर आपला संताप व्यक्त केला.नाईलाजास्तव घेतले महागडे भोजनमागील १५ दिवसांपासून आयआरसीटीसीने जनाहारचा ताबा घेतल्यानंतर डागडुजीच्या कारणामुळे जनाहार उपहारगृह बंद होते. शुक्रवारी जनाहार सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी जनता खाना विकत घेण्यासाठी जनाहारकडे धाव घेतली. परंतु तेथे जनता खाना न मिळाल्याने त्यांना नाईलाजास्तव महागडे भोजन विकत घेण्याची पाळी आली. यात त्यांना दुपटीपेक्षा अधिक रक्कम मोजण्याची पाळी आली.‘आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार‘आयआरसीटीसी’ने जनाहारचा ताबा घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने कोणत्या नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, याची माहिती शनिवारी घेणार आहो. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याना बोलावून जनता खाना त्यांच्या यादीत आहे की नाही यावरही चर्चा करण्यात येईल.’-बृजेश कुमार गुप्ताडीआरएम, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीnagpurनागपूर