शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात प्रेमरंगी रंगली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:26 IST

व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा गुरुवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. कुणाच्या पदरात होकार पडला, कुणाच्या नकार. पण, म्हणून या प्रेमोत्सवाचा आनंद काही कमी झाला नाही. काही प्रतिगामी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता तरुणाईने अगदी दणक्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

ठळक मुद्देदणक्यात व्हॅलेंटाईन डे साजरा

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा गुरुवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. कुणाच्या पदरात होकार पडला, कुणाच्या नकार. पण, म्हणून या प्रेमोत्सवाचा आनंद काही कमी झाला नाही. काही प्रतिगामी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता तरुणाईने अगदी दणक्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या दिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. या क्रमात कुणी रक्तदान केले तर कुणी भारतमातेच्या प्रतिमेला गुलाबाचे फूल भेट देत राष्ट्रप्रेम जागवले. मागच्या सात दिवसांपासून व्हॅलेंटाईन वीक साजरे करणाऱ्या तरुणार्ईला व्हॅलेंटाईन डेची विशेष प्रतीक्षा होती. अखेर आज हा दिवस उगवताच अनेकांनी प्रेमाचा रंग असलेल्या लाल रंगाचे वस्त्र घालून महाविद्यालय गाठले. शहरातील प्रत्येकच महाविद्यालयाचे कट्टे आज बहरले होते.न्यू इयर असो फ्रेण्डशिप डे वा व्हॅलेंटाईन डे. उपराजधानीतील तरुणाईची पावले आपसूकच फुटाळा, अंबाझरी तलावाकडे वळतात. तरुणाईच्या हक्काचे हे डेस्टिनेशन या प्रेमोत्सवदिनी जणू ‘लव्ह स्टेशन’ झाले होते. प्रेमीयुगुलांच्या गर्दीने फुटाळा दिवसभर फुलले होते. संध्याकाळी तर जणू या ठिकाणाला यात्रेचेच स्वरूप आले होते. हातात रेड बलून घेतलेले ती आणि तो फुटाळयाच्या प्रत्येक कोपºयावर नजरेस पडत होते. कुणी आपल्या जीवलगाला द्यायला भेटवस्तू आणली होती तर कुणी आपल्या हळव्या भावनांना शुभेच्छापत्रांच्या हवाली केले होते.कुटुंबीयांसोबत हॉटेलिंगकेवळ तरुणाईच नाही तर प्रत्येकच वयोगटातील हौशी मंडळींनी या प्रेमोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. अनेक जण सहपरिवार जेवायला आल्यामुळे शहरातील हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली होती. काही प्रसिद्ध हॉटेल्सनी हा क्षण कॅश करण्यासाठी स्पेशल पॅकेजही जाहीर केले होते. या पॅकेजसचाही लाभ उचलण्यात आला. काहींनी जवळपासच्या पर्यटनस्थळी तर काहींनी देवदर्शनाने हा दिवस साजरा केला.बाईकर्सवर होता वॉचव्हॅलेंटाईन डेला बाईकर्स हुडदंग घालतात, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी फुटाळा तलाव व तेलंखेड़ी परिसरात करडी नजर ठेवली होती. असा गोंधळ घालणाऱ्या बाईकर्सविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सेमिनरी हिल्स, तेलंखेड़ी, वायुसेना नगर, फुटाळा टी पाईंट अशा अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेnagpurनागपूर