शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:25 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका युवकाने गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देचारित्र्यावर संशय ठरले कारण : लग्नाच्या सहा महिन्यातच घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका युवकाने गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार सुरू आहे. लग्नाच्या सहा महिन्याच्या आत ही घटना घडल्याने पत्नीच्या कुटुंबाला धक्काच बसला आहे. ही घटना मानकापूर झिंगाबाई टाकळी परिसरातील आहे. मृताचे नाव दीपाली ऊर्फ रोशनी राऊत (३०) व आरोपीचे नाव योगेश राऊत (३५) आहे.योगेश हा मानवतानगर येथे राहतो. तो मार्केटिंग रिप्रझेंटेटिव्ह आहे. दीपाली ही एसटीमध्ये कंडक्टर होती. ती यवतमाळच्या पांढरकवडा डेपोत कार्यरत आहे. योगेशचे लग्न डिसेंबर २०१८ मध्ये झाले होते. दीपाली चार-पाच महिन्याची गर्भवती सुद्धा आहे. ती गर्भवती राहिल्यानंतर दोघांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला होता. योगेश हा दीपालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिच्या पोटातील गर्भ माझा नसल्याचे तो सांगत होता. दीपाली पांढरकवडा येथे किरायाने राहत होती. तिला मित्रांचे फोन येत होते. त्यामुळे योगेशचा संशय आणखी वाढला होता. तो दीपालीला फोन करणाऱ्याच्या संबंधाबाबत विचारणा करीत होता.संशय व्यक्त करण्यात येतो की, ११ मे रोजी दुपारी नायलॉनच्या दोरीने योगेशने तिच्या गळ्याला फास लावला. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन केले. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास योगेशच्या वडिलानी त्याला आवाज दिला. तेव्हा अस्वस्थ अवस्थेत योगेशने दरवाजा उघडला आणि तो बेहोश झाला. त्याच्या बाजूलाच दीपाली पडलेली होती. वडिलांनी दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दीपालीला मृत घोषित केले तर योगेशला मेडिकलमध्ये भरती केले. योगेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या सूचनेनुसार दीपालीचे वडील अशोक होरे नागपुरात पोहचले. अशोक होरे यांच्या तक्रारीवर मानकापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. दीपालीच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिची गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे मंगळवारी पोलिसांनी दीपालीच्या वडिलांच्या तक्रारीवर हत्येचा गुन्हा दाखल केला. घटनेचे नेमके कारण योगेशला शुद्ध आल्यानंतरच कळेल. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून