शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आता रविवारीही राहणार वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:45 IST

महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.

ठळक मुद्देआठवड्यात दोन दिवस मेन्टेनन्स : नागरिकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.नियमानुसार महावितरण आठवड्यातून एक दिवस मेन्टेनन्ससाठी वीज पुरवठा बंद ठेवू शकते. परंतु एकाच ठिकाणी वारंवार वीज बंद ठेवू नये, असाही नियम आहे. परंतु महावितरण आता हा नियम स्वत:च तोडत आहे. यासाठी आठवड्याच्या दुसरा दिवस म्हणून रविवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. १ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गणेशनगर फीडर, जुना बगडगंज फीडरशी जुळलेल्या परिसरात वीज बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान या परिसरात भूमिगत वीज लाईन टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. याचप्रकारे एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटविण्यासाठी सुद्धा रविवार १ मार्च रोजी सुभेदार ले-आऊट, आशीर्वादनगर परिसरात सकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल.वीज खांब हटविण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याची बाब तर्कसंगत आहे. परंतु यासाठी मनपासोबत समन्वय साधावा लागतो. तसेच हे काम उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशावर होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणला नाईलाजास्तव एकापेक्षा जास्त दिवस हे काम करावे लागते. परंतु भूमिगत लाईन टाकण्याचे काम मेंटेनन्स अंतर्गत येते. त्यासाठी बुधवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे काम रविवारी केल्याने महावितरणमध्येही नाराजी आहे. कंपनीचे अधिकारी म्हणतात की, आता पाच दिवसाचा आठवडा झाला आहे. शनिवार-रविवारी बहुतांश कर्मचाऱ्यांची सुटी राहील.केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारे फिल्डमध्ये काम करणारे कर्मचारी तैनात राहतील. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना मेंटनन्ससाठी रविवारी सुटीच्या दिवशीही काम करावे लागणार आहे. रविवारी वीज पुरवठा बंद ठेवल्याने नागरिकांनाही सुटीच्या दिवशी विजेविना राहावे लागेल. दुसरीकडे महावितरणने म्हणणे आहे की, उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नेटवर्क योग्य ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यावर भर दिला जात आहे.वीज तर जातच आहेमेंटनन्सचा मुख्य उद्देश अखंडित वीज पुरवठा करणे होय. परंतु दर आठवड्यात अनेक तास वीज बंद ठेवल्यानंतरही अधूनमधून वीज जाण्याचे प्रकार बंद झालेले नाही. दहा मिनिटे ते अर्धा तासापर्यंत वीज बंद राहणे ही नेहमीचच बाब झाली आहे. अशा परिस्थितीत मेंटनन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन