शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

‘मीम्स’च्या माध्यमातून नागपूर पोलिसांची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:21 IST

ट्विटर या माध्यमावर नागपूर पोलिसांनी कायद्याच्या जनजागृतीसाठी ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर प्रसारित केलेले ‘मीम्स’ सर्वत्र गाजत आहेत.

ठळक मुद्देतहाउद्दीनची कल्पक किमया

अंकिता देशकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्विटर या माध्यमावर नागपूर पोलिसांनी कायद्याच्या जनजागृतीसाठी ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर प्रसारित केलेले ‘मीम्स’ सर्वत्र गाजत आहेत. ज्यांना टिष्ट्वटरबाबत अधिक माहिती नाही त्यांच्यासाठी पोलिसांनी ‘शोले’ चित्रपटाची पार्श्वभूमी ठेवून चौकाचौकात पोस्टर्स लावले आहेत. ड्रंकन ड्राईव्ह, हेल्मेट वापरण्याचे फायदे व इतर कायदेविषयक गोष्टींवर जनजागृती करणारे हे पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. जनजागृतीचा उद्देश साधतानाच पोलिसांची लोकप्रियता वाढविण्यात या मीम्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांच्या या कलात्मक जनजागृतीमागे मेंदू आहे तो तहा उद्दीन या १९ वर्षीय तरुणाचा.तहा उद्दीन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी. डोळ्याने खाणाखुणा करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश हिचा व्हिडीओ ट्रेन्डमध्ये असताना तहाने सहजच शहर पोलिसांसाठी तिच्यावर मीम्स तयार करून टिष्ट्वटरवर शेअर केला. अनेकांना तो आवडलाही. त्यात नागपूर पोलिसांचाही समावेश होता. पोलिसांनी तहाला मुलाखतीसाठी बोलाविले. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेतली. त्यांनाही या नव्या ट्रेंड्सची कल्पना पटली. असे विनोदी मीम्स तयार करून शहर पोलिसांच्या आॅफिशियल अकाऊंटवर प्रसारित करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस आयुक्तांच्या या सकारात्मकतेमुळे उत्साह वाढल्याचे त्याने सांगितले. तहा स्वत: मीम्सची निवड करतो, त्याचे कन्टेंट लिहितो व पोलिसांच्या संबंधित विभागाकडे अंतिम निर्णयासाठी सादर करतो. विविध कसोट्यांवर तपासणी करून होकार आला की तो प्रसारित करतो.तहाने तयार केलेले अभिनेत्री राधिक आपटे हिचे नेटवरील अपिरन्स, कौबक आणि अजय देवगणवर तयार केलेले ‘नाहीतर आता आमची सटकेल’ हे मीम्स बरेच गाजले. शहरातील ११ चौकात लागलेले ‘शो-लॉ’चे पोस्टर्स सध्या लोकांचे लक्ष वेधत आहेत. विनोदी गोष्टींकडे लोकांचे लक्ष लवकर वेधले जाते. त्यामुळे अशा विनोदी मीम्समधून लोकांना नियम पाळण्यासाठी जागृत करीत असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे तो म्हणाला. आई मल्लिका कलीम या प्राध्यापक व वडील एम. कलिम हे वकील आहेत. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

वयात बरेच अंतर असले तरी आमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत साम्य आहे. तहाचे कन्टेंट हे लोकाभिमुख असून लक्ष वेधणारे आहेत. त्याने काम सुरू केल्यापासून पोलिसांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील लाईक्स आणि रिटिष्ट्वट करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकांना काय आवडेल, याची त्याला कल्पना आहे व चांगले काहीतरी देण्याचा तो प्रयत्न करतो.- विशाल माने, एपीआय (सायबर सेल)

टॅग्स :Policeपोलिस