शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एस.के. बीअरबारमध्ये पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 23:15 IST

हुडकेश्वर पोलिसांनी मानेवाडा चौकाजवळच्या एस. के. बीअरबारमध्ये छापा घातला आणि तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देबंदी असतानाही मद्याची विक्री : हुडकेश्वर पोलिसांनी केला दारूसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी मानेवाडा चौकाजवळच्या एस. के. बीअरबारमध्ये छापा घातला आणि तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. तुषार दिलीप वानखेडे (रा. अलंकारनगर), मिलिंद देवीदास खाडे आणि जावेद ऊर्फ गुड्डू कयूम शेख (रा. ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग) अशी या तिघांची नावे आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर बार आणि मद्याची सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे नागपुरातील सर्व बीअरबार आणि मद्याची दुकाने बंद करून त्यावर सरकारी सील लावण्यात आले. परंतु अनेक बारमालक आपल्या सील केलेल्या बारमधून बेमालूमपणे दारू बाहेर काढतात आणि ती दामदुप्पट किमतीने छुप्या मार्गाने विकतात. नागपूर शहरात हा प्रकार सर्रास सुरू आहे. तशा प्रकारचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. दरम्यान, मानेवाडा चौका जवळच्या एस. के. बीअरबारमध्ये असलेला मद्यसाठा छुप्या मार्गाने आरोपी तुषार वानखेडे, मिलिंद खाडे आणि जावेद शेख ग्राहकांना विकत असल्याची माहिती या भागात होती. त्यामुळे बीअरबार जेथे आहे, त्या शारदा अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या माळ्यावर मद्यशौकिनांची मोठी गर्दी होत होती. ही माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांनी गुरुवारी रात्री तेथे बनावट ग्राहक पाठवून कोणती कोणती दारू मिळते त्याची शहानिशा करून घेतली. त्यानंतर छापा घातला. पोलिसांना या छाप्यात रॉयल स्टॅग, क्रिसेंट, मॅजिक मोमेंट अशा वेगवेगळ्या महागड्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर आढळल्या. त्याची विक्री करणाºया उपरोक्त आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला. प्राथमिक चौकशीत उपरोक्त आरोपींनी एस. के. बारमधून ही दारू काढली आणि ते ती बंदी असतानादेखील विकत होते हे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वरचे ठाणेदार राजकमल वाघमारे, पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, हवालदार प्रवीण गाणार, मनोज नेवारे, शिपाई विलास चिंचोळकर, चंद्रशेखर कौरती आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी ही कामगिरी बजावली.अनेक ठिकाणी हाच प्रकार!विशेष म्हणजे, एस. के. बारसारखाच प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. बारमालक छुप्या पद्धतीने बारमधून दारूसाठा काढून तो ग्राहकांना अवैधपणे दामदुप्पट रक्कम घेऊन विकत आहेत. दोसर भवन चौकातील मदिरा बीअरबारचा मालक नीरज गुप्ता याने संगनमत करून त्याच्या बारमधील बीअरचा साठा नातेवाईकांच्या मेडिकल स्टोअर्समध्ये ठेवला आणि तेथून या बीअरची विक्री होत होती. गणेशपेठ पोलिसांनी तेथे छापा घालून कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मदिरा बीअरबारचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. या कारवाईचा शुक्रवारी बोभाटा झाला असतानादेखील मानेवाडा चौकाजवळच्याच एका बीअरबारमधून बारमालक आणि त्याचे साथीदार मागच्या बाजूने दारूच्या पेट्या काढून त्या कारमध्ये ठेवत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र २४ तासांपेक्षा जास्त वेळ होऊनही संबंधित बारमालकावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही.

टॅग्स :raidधाडNagpur Policeनागपूर पोलीसliquor banदारूबंदी