शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

नागपुरातील दुय्यम पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 10:42 IST

सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण करण्याच्या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याच्यावर अखेर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएक वर्षापासून मुलीवर करीत होता अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण करण्याच्या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव याच्यावर अखेर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जाधव याने सरकारी नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक शोषण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आल्याने वाडी पोलिसात खळबळ उडाली होती. अटकेच्या भीतीपोटी जाधव वैद्यकीय रजेवर गेले होते व अटकपूर्व जमीनही मिळवीला होता.प्राप्त माहितीनुसार पीडिता ही नागपूर शहरातील असून पोलीस विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मुलगी होती. पीडिता वाडी पोलीस स्टेशनला ३१ डिसेंबर २०१७ ला एका मुलीच्या मिसिंग बाबत तक्रार करण्यासाठी मैत्रिणीसोबत आली असता प्रशांत जाधव याच्या संपर्कात आली. त्याने या प्रकरणात तिला मदत केली. यानंतर तिचा नंबर घेऊन सारखे फोन करून तू मला भेटायला ये तुझा फोटो पाठव मला झोप येत नाही,आपण कुठेतरी फिरायला जाऊ. माझा संपूर्ण परिवार एका अपघातात संपला असून माझे आता कुणीही नाही. मी तुझ्यासोबत लग्न करतो शासकीय नोकरी लावून देतो अशा प्रकारचे आमिष देत होता. त्याच्या या भूलथापांना तरुणी बळी पडली. जयताळा तसेच शहरातील विविध ठिकाणी त्यांच्या भेटी झाल्या.त्याने फेब्रुवारी २०१७ ला नोकरी लावून देण्यासाठी बायोडाटाची गरज असल्याचे सांगत तरुणीला डिफेन्स गेट न २ जवळ सायंकाळी बोलाविले. तेथून प्रशांत जाधव याने डिफेन्सस्थित सेक्टर नंबर 1/3/71 क्वॉर्टर न. ६ मध्ये नेऊन रात्रभर पीडितास तेथे थांबवून शारीरिक शोषण केले. यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे जाधव निघून गेला.गावावरून परत आल्यावर पीडिता दातांची तपासणी करण्याकरिता लता मंगेशकर येथे आहे अशी माहिती मिळाल्यावर तिला त्याने परत डिफेन्स क्वॉर्टर मध्ये आणून लग्नाचे आमिष देत शोषण केले अशाप्रकारे नित्यनेमाने तो पीडितावर बलात्कार करीत होता. तो पीडिताला गर्भनिरोधकाच्या गोळ्या देत असल्याने शारीरिक संबंध होऊनही गर्भधारणा झाली नाही. कालांतराने दोघात वाद झाला. यानंतर पीडिताला मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थपित करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता.आपली फसवणूक झाली असल्याचे पीडिताच्या लक्षात येताच ती वाडी पोलीस स्टेशनला संबंधित अधिकाऱ्याला भेटायला वारंवार यायची.पण त्याची भेट व्हायची नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी वाडी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. याबाबत पीडिताचे नातेवाईक व पोलिसांची राहुल हॉटेलमध्ये बैठकही झाली होती. परंतु पीडिता तडजोड करायला तयार झाली नाही. आपली तक्रार वाडी पोलीस घेणार नाही म्हणून शेवटी पीडिताने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची लेखी तक्रार पोलीस आयुक्तकडे केली. यानंतर या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोेलीस अधिकाऱ्यांनी केली असता पीडिताने आरोपी संदर्भात दिलेल्या पुराव्यात चौकशीत तथ्य आढल्याने पोलिसांनी तिच्या लेखी तक्रारीनुसार प्रशांत जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग