शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

नागपूर पोलिसांनी गायब केले सव्वादोन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:44 IST

‘रमी क्लब’वर टाकलेल्या धाडीदरम्यान गणेशपेठ पोलिसांनी २ लाख २० हजार रुपये उडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पीडित व्यक्तीने सहपोलीस आयुक्तांकडेच ‘व्हिडीओ क्लिपिंग’सह याची तक्रार केली आहे; सोबतच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युथ काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगणेशपेठ पोलिसांवर आरोप : ‘व्हिडीओ क्लिपिंग’सह सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘रमी क्लब’वर टाकलेल्या धाडीदरम्यान गणेशपेठ पोलिसांनी २ लाख २० हजार रुपये उडविल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पीडित व्यक्तीने सहपोलीस आयुक्तांकडेच ‘व्हिडीओ क्लिपिंग’सह याची तक्रार केली आहे; सोबतच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युथ काँग्रेसकडून करण्यात आली आहे.वाडी येथील रहिवासी शब्बीर शेख यांचा गंजीपेठ येथे विश्वनाथ बहुउद्देशीय क्रीडा मंडळ या नावाने ‘रमीचा क्लब’ आहे. क्लब चालविण्यासाठी २५ एप्रिल रोजी आनंद वानखेडे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने ५० हजार रुपयांची मागणी केली. वानखेडेने ठाणेदार गांगुर्डे यांच्या नावाने आणखी ५० हजार व इतरांसाठी २० हजार प्रति महिना देण्याचेदेखील शेख यांना सांगितले. शेख यांनी याला नकार दिला व त्यानंतर २८ मार्च रोजी ‘क्लब’वर छापा मारण्यात आला. तेथे पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली. त्यावेळी शब्बीर यांची दुचाकी ‘क्लब’च्या बाहेर उभी होती. त्यात २ लाख २० हजार रुपये होते. वानखेडेने ही रक्कम स्वत:जवळ ठेवून घेतली. ‘क्लब’मध्ये बसलेल्या इतर व्यक्तींच्या वाहनांमधूनदेखील पैसे काढण्यात आले. हा सर्व प्रकार ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाºयांनी दुचाकी वाहनांच्या डिक्कीमधून मिळालेल्या रकमेबाबत कारवाईत काहीही उल्लेख केला नाही, अशी तक्रार शब्बीर शेख यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे दाद मागितली. त्यांनी कुठलेही पाऊल न उचलल्याने मंगळवारी युवक काँग्रेसचे सचिव अजित सिंह यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडे तक्रार केली. बोडखे यांनी प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.गणेशपेठमध्ये गैरप्रकार वाढलेगणेशपेठ पोलीस ठाण्यातून वसुलीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या परिसरात अवैध धंदे व गैरप्रकारांना अभय मिळाले आहे. हॉटेल चालक तसेच ट्रॅव्हल्सच्या चालकांकडूनदेखील वसुली करण्यात येते, असा आरोप अजित सिंह यांनी केला व शिवाजी बोडखे यांनादेखील याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे आणि आनंद वानखेडे यांना निलंबित करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा