शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

नागपूर पोलीस आयुक्तांचे ऑपरेशन क्राईम कंट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 22:39 IST

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या नागपुरातील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर करून शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त केले.

ठळक मुद्दे२४ महिन्यात २० टोळ्या पोहचविल्या कारागृहात : ११७ गुंडांवर मकोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या नागपुरातील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर करून शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त केले. शहरात ऑपरेशन क्राईम कंट्रोल राबविताना कुख्यात गुन्हेगारांच्या २० टोळ्यांमधील ११७ गुन्हेगारांवर मकोका तसेच ५१ खतरनाक गुंडांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले.जुलै २०१८ ला डॉ. उपाध्याय यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली होती. आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ऑपरेशन क्राईम कंट्रोल अंतर्गत विविध उपक्रम राबविले. त्यानुसार शहरातील १६, ७१२ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ११२१ गुन्हेगारांना घातक शस्त्रासह पकडले. ऑपरेशन क्रॅकडाऊन चालवून त्यांनी शहरातील गुंडांवर नियंत्रण मिळविले. ऑपरेशन वॉश आऊटनुसार विविध ठिकाणच्या अवैध धंद्यावर छापेमारी करण्यात आली. शहरातील गुंड निवडणुकांच्या काळात कमालीचे सक्रिय होतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ठोको स्कॉड बनविला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्राईम इंटेलिजन्स युनिट बनवून शहरातील गुन्हेगारांवर नजर ठेवली. शहरातील सडकछाप मजनूना तसेच महिला मुलींचे दागिने हिसकावून पळणारासाठी विशेष पथके तयार करुन नागपुरातील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याना आळा घातला. नागपूरला फ्री सिटी बनविण्याचा संकल्प व्यक्त करताना त्यांनी आबू खान सारख्या ड्रग माफियाचे नेटवर्क उद्ध्वस्त केले. शहरातील २८९ तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पावणेचार कोटी रुपयांचे मादक पदार्थ जप्त केले. डॉ. उपाध्याय यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच कळत-नकळत गुन्हेगारीत अडकलेल्या अल्पवयीन मुलांसाठीही विशेष उपक्रम राबविले.महिलांसाठी होम ड्रॉप योजनापोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शहरातील महिला मुलींसाठी राबविलेली होम ड्रॉप योजना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. या योजनेचे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील पोलिसांकडून कौतुक झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावाची चाहूल लागताच शहर पोलीस दल रस्त्यावर आले. त्यामुळे सुरुवातीला कोरोनाचे संक्रमण रोखण्यात नागपूरला चांगले यश आले होते. आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत सर्वच स्तरातील मंडळीकडून गुन्हेगारी नियंत्रणासाठी चांगले सहकार्य मिळाल्याची भावना डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमत'शी बोलून दाखविली. नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याचे सांगून त्यांनी नागपूरकरांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय